Share

milid narvekar : हे ज्यांनी केलं त्यांचा मला अभिमान आहे; मिलिंद नार्वेकरांच्या पोस्टने चर्चांना उधाण

Milind Narvekar

मिmilid narvekar share post  | बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला ३० वर्षे पुर्ण झाली आहे. मशिद पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी बाबरी मशिदीवर एक वक्तव्य केलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचं ते वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होतं. आता त्या वक्तव्यावर बोलत उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर बाबरी मशिदी पाडण्याच्या दिवसावर प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदूंची साडेतील हजार देवळं पाडून त्यावर मशिदी बांधण्यात आल्या. साडेतीन हजार. आम्ही काय म्हणतो आम्हाला साडेतीन हजार मशिदी पाडायच्या नाहीत. आता आम्हाला काशी आणि मथुरा येथील दोन मशिदी पाडायच्या आहेत. बाकी ठेवा तुमच्याकडे, असे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते.

आता ३० वर्षे पुर्ण झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी यावर फेसबूक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. बाबरी मशिद पाडल्याचा एक फोटो मिलिंद नार्वेकर यांनी शेअर केला आहे. हे ज्यांनी केलं त्यांचा मला अभिमान आहे, असे कॅप्शन फोटोला देण्यात आले आहे.

तसेच या पोस्टरवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटोही आहे. पण त्यांच्या या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. आजच्याच दिवशी ३० वर्षांपूर्वी ६ डिंसेबर १९९२ ला कारसेवकांनी बाबरी मशिदीची वास्तू पाडली होती. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये राम मंदिराची चळवळ सुरु केली होती.

https://twitter.com/NarvekarMilind_/status/1599834981626679296?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1599834981626679296%7Ctwgr%5E3e2a7f47bde06bf07b92a7b06079e41e73a2677d%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.sarkarnama.in%2Fmumbai%2Fmilind-narvekar-evoked-memories-by-sharing-the-photo-of-the-demolition-of-babri-masjid-as91

५ डिसेंबर १९९२ पासून अयोध्येतील वादग्रस्त इमारतीजवळ कारसेवक येण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने भजन-किर्तनाला परवानगी दिली होती. पण दुसऱ्याच दिवशी जमावाने बाबरी मशिद पाडली होती. त्यावेळी दीड लाखांहून अधिक कारसेवकांनी बाबरी मशिद पाडल्याचे म्हटले जात होते.

या घटनेनंतर मुंबईसह देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या होत्या. या दंगलीत २ हजारांपेक्षा जास्त लोक मारले गेले होते. त्यानंतर ४९ जणांना याप्रकरणी आरोपी घोषित करण्यात आले होते. २८ वर्षे हा खटला चालला. पण पुराव्याअभावी २०२१ मध्ये सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या-
vasant more : येत्या २ दिवसात वसंत मोरे मनसे सोडणार? आता पक्ष पदाधिकाऱ्यांनीच दिला ४८ तासांचा अल्टीमेटम
sharad pawar : …नाहीतर मलाच बेळगावात जावं लागेल; शरद पवारांनी कर्नाटकला दिला ४८ तासांचा अल्टिमेटम
पहिल्यांदाच विमानात बसले वृद्ध जोडपे; ‘या’ दयाळू व्यक्तीने बोर्डींगसाठी केली मदत, नंतर विमानात जेवणही दिले

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now