..त्यामुळे बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्यापुर्वी माईक टायसन करायचा हार्डकोर सेक्स, ड्रायव्हरचा मोठा खुलासा

जगात अनेक खेळाडू आहेत ज्यांचे नाव प्रत्येकाला माहिती असते. पुर्ण जगात त्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. असेच एक नाव आहे माईक टायसन. माईक टायसनला बॉक्सिंगमधील सगळ्यात घातक खेळाडू मानले जाते.

त्याने आतापर्यंत अनेक खेळाडूंना बॉक्सिंगमध्ये धूळ चारली आहे. बॉक्सिंग हा खेळ जरी भारतात एवढा लोकप्रिय नसला तरी माईक टायसन हे नाव सगळ्यांना माहिती आहे. त्याने खेळलेल्या अनेक फाईट्स आजही लोक आवडीने पाहतात. पण सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

त्याच्या ड्रायव्हरने खळबळजनक दावा केला आहे. तो म्हणाला आहे की, बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्यापुर्वी स्वताला शांत करण्यासाठी टायसनला महिलांशी हार्डकोर सेक्स करावा लागायचा. द सन या ब्रिटीश माध्यमाशी बोलताना माजी ड्रायव्हरने हा खुलासा केला आहे. त्या ड्रायव्हरचे नाव रूडी गोन्झालेझ आहे.

यावेळी त्याने असा दावा केला की, माईक टायसन हा बॉक्सिंगच्या सामन्यात खुप आक्रमक व्हायचा. आपल्या आक्रमकतेमुळे समोरच्या प्रतिस्पर्धीचा मृत्यु होईल अशी भिती माईक टायसनला वाटायची. त्यामुळे स्वताला शांत ठेवण्यासाठी तो सामन्यापुर्वी तो महिलांशी सेक्स करायचा.

माईकच्या आयुष्यातील हे सर्वात मोठं रहस्य आहे. सामन्याच्या आधी त्याला ड्रेसिंग रूममध्ये सेक्स करावा लागायचा. सामन्यापुर्वी मला सेक्स करायला भेटला नाही तर मी प्रतिस्पर्धीला मारू शकतो असं टायसन मला सांगायचा. तो महिलांसोबत काही मिनिटांसाठी जायचा. परत आल्यानंतर तो म्हणायचा, आता माझा प्रतिस्पर्धी जिवंत राहील.

प्रतिस्पर्धीचा जीव जाईल याची भिती टायसनला वाटायची आणि हे काम तो करू शकेन हे टायसनला माहिती होतं. माईक टायसनच्या ड्रायव्हरने हा खुलासा केल्याने माईक टायसन पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. माईक टायसनने सध्या बॉक्सिंगमधून सन्यास घेतला आहे.

तो त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट बॉक्सर होता. तो सगळ्यात खतरनाक आणि क्रुर बॉक्सर मानला जायचा. समोरचा प्रतिस्पर्धी कितीही जखमी झाला तरी तो त्याला सोडत नसायचा. दणादण बुक्के मारून माईक समोरच्या प्रतिस्पर्धीला काही मिनीटातच चितपट करण्यात प्रसिद्ध आहे.

महत्वाच्या बातम्या
ताडोबात वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी; पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडली घटना
किरीट सोमय्या पुन्हा आक्रमक, म्हणाले 10 लोकांना जेलमध्ये टाकणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री.. 
अमरावती हिंसाचार प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांना पकडल्याने फडणवीस आक्रमक; दिला ‘हा’ इशारा
मोदी सरकार BSNL आणि MTNL ची करोडोंची संपत्ती विकणार; जाणून घ्या नेमकी किंमत..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.