मिका सिंग आणि केआरकेमध्ये रंगला वाद; मिका सिंग म्हणाला, “मी केआरकेचा बाप आहे”

कमाल खान म्हणजेच केआरके नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर बिंधास्तपणे वेगवेगळ्या मुद्यांवर आपले मत मांडत असतो.  राधे चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिल्याने तो चर्चेत आला होता.

सलमान आजोबांच्या वयाचा असून आपल्या नातीसारख्या असणाऱ्या दिशासोबत रोमान्स करतोय. हा चित्रपट आहे की पब्जी गेम असा प्रश्न पडतोय. हा चित्रपट कोरोनासारखा भयानक आहे. कोरोना फुफ्पुसांवर हल्ला करतो आणि राधे तुमच्या मेंदूवर.

त्यामुळे तुम्हाला तुमचा मेंदू सुरक्षित ठेवायचा असेल, या चित्रपटापासून लांब रहा, असे केआरकेने म्हटले होते. यानंतर भाईजान सलमान खान चांगलाच संतापला होता. त्याने अभिनेता, दिग्दर्शक केआरकेविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे.

केआरके आणि सलमान खानच्या वादाची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. यानंतर प्रसिध्द सिंगर मिका सिंग  भाईजान सलमानखानच्या पाठीशी उभा राहिला होता. केआरकेने मिका सिंगला नाकाने गाणं म्हणणारा सिंगर असं म्हटलं होतं.

यानंतर मिका सिंग केआरकेवर भडकला होता. दोघांमध्ये दिवसेंदिवस वाद वाढतच चालला आहे. यावर मिकासिंगनेही केआरकेला प्रतिउत्तर दिले आहे. मिका सिंग ट्विट करत म्हणाला केआरके फक्त बॉलिवूडमधील सभ्य, प्रसिध्द लोकांशी पंगा घेतो, पण बाप लोकांशी नाही.

प्लीज माझ्या मुलाला सांगा मला अनब्लॉक कर प्लीज.  मी करन जौहर, अनूराग कश्यप नाही. मी याचा बाप आहे. यानंतरही मिका सिंग शांत बसला नाही. एका मुलाखतीत मिका सिंग म्हणाला, सलमान खानने केआरकेवर मानहानीचा दावा दाखल करून योग्य केलं आहे. सलमानने उशीर केला आहे दावा दाखल करायला.

पण माझ्याकडून केस वगैरे काही होणार नाही. सरळ झापड लावेल. केआरके इतका मोठा उंदीर आहे की तो आपल्या बिळाबाहेर येणार नाही. कारण त्याला माहिती आहे जसा तो बाहेर निघेल त्याला झापड पडणार आहे.

यानंतरही केआरके शांत बसला नाही, त्याने पुन्हा एक ट्विट केले आणि म्हणाला, आता या प्रकरणात चिरकूट सिंगरने पब्लिसिटी मिळवण्यासाठी उडी घेतली आहे. पण मी हे होऊ देणार नाही. जितक्या उड्या माराच्या आहेत मार. मी तुला भाव देणार नाही.  कारण तुझी लायकी नाही. असं केआरके म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या-
…म्हणून सलमानच्या राधेमध्ये छोटीशी भुमिका साकारली; चाहत्यांच्या टिकेनंतर प्रविण तरडेंचा खुलासा
कुटुंबानेच कोरोना रुग्णाचा मृतदेह फेकला नदीत?; धक्कादायक व्हिडिओ होतोय व्हायरल
‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नवीन ट्विस्ट, कार्तिकच्या आयुष्यात नवीन मुलीची एंट्री
या आजोबांच कोरोनासुद्धा काही वाकडं करू शकत नाही; व्हिडीओ पाहून पोटं धरून हसाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.