परराज्यातील मजुरांना लॉकडाऊनची भीती; स्थलांतरित कामगार पुन्हा आपल्या गावी

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून वेगवेगळ्या गाईडलाईन्स आखण्यात आल्या असून काही निर्बंध सुद्धा लादण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याची शक्यता वाढली आहे.

राज्यात काही जिल्ह्यात टाळेबंदी केली जात असल्याने नागरिकांच्या मनातील धाकधूक वाढत आहे. अशात हॉटेल, रेस्टॉरंट, उपहारगृहे बंद झाल्याने कामगारांची चिंता वाढली आहे, त्यामुळे दुसऱ्या राज्यातील कामगारांनी पुन्हा गावाकडची वाट धरली आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, पनवेल, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथुन गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढताना दिसून येत आहे. एलटीटीहुन रोज परराज्यात जाणाऱ्या २० गाड्या आहे. या गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पटनाला जातात.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासात राज्यात ४७ हजार ८२७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. राज्यात परिस्थिती बिघडल्यामुळे काही दिवसांसाठी राज्य सरकारने काही निर्बंध घातले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.