Share

Pune Crime News: रोहित ठोक रे.. ‘आज त्याची विकेटच टाकू’, निलेश घायवळ टोळीचा पुण्यात भर रस्त्यात गोळीबार, नेमकं काय घडलं?

Pune Crime News:  पुणे (Pune) शहरातील कोथरूड (Kothrud) परिसरात बुधवारी (दि. १७) मध्यरात्री कोथरूड पोलिस ठाण्यापासून फक्त १०० मीटर अंतरावर धडाकेबाज हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्याचा मुख्य घटक निलेश घायवळ टोळी (Nilesh Ghaywal Gang) असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी प्रकाश मधुकर धुमाळ (Prakash Madhukar Dhumal, वय ३६, रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) आणि वैभव तुकाराम साठे (Vaibhav Tukaram Sathe, वय १९, रा. श्रीकृष्णनगर, सागर कॉलनी, कोथरूड) या तरुणांवर गुन्हेगारांनी सलग हल्ले केले.

घटनाक्रमानुसार, प्रकाश धुमाळ मित्रांसोबत रस्त्यावर उभे राहून गप्पा मारत होते, तेव्हा दुचाकीवरून आलेल्या निलेश घायवळ टोळीतील आरोपी मयूर कुंबरे (Mayur Kumbare), रोहित आखाडे (Rohit Akhade) आणि गणेश राऊत (Ganesh Raut) यांनी त्यांच्याशी वाद घातला. मयूर कुंबरेने पिस्तुलातून सलग गोळ्या झाडल्या, यापैकी एक गोळी धुमाळ यांच्या मांडीला लागली. जीव वाचवण्यासाठी धुमाळ जवळील पाण्याच्या टाकीआड धावत गेले. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अवघ्या दहा मिनिटांतच त्याच टोळीतील आरोपींनी जुन्या वैवहारिक वादातून वैभव तुकाराम साठे यांच्यावर कोयत्याने वार केला. वैभवला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही घटनांप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींवर विविध कलमांसह आर्म्स अॅक्टनुसार कारवाई सुरू आहे.

फिर्यादीत धुमाळ यांनी सांगितले की, आरोपींनी “तुला लय माज आला आहे का? इथे कशाला थांबला आहे. हा आमचा एरिया आहे, रोहित ठोक रे यांना, मयूर्या खाली उतरून बघरे यांना, यांची आज विकेटच टाकू” असे म्हणत गोळीबार केला. काही मिनिटांनी त्यांनी वैभव साठे याच्याकडे लक्ष वळवून कोयत्याने हल्ला केला.

कोथरूड पोलिसांनी मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास (Mayank alias Monty Vyas), आनंद चांदलेकर उर्फ अंड्या (Anand Chandlekar alias Andya), दिनेश फाटक (Dinesh Phatak) यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. पोलिसांनी सांगितले की, रोहित, गणेश आणि मयूर हे निलेश घायवळ टोळीतील सराईत गुंड आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now