मायक्रोसॉफ्ट(Microsoft) या सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ सत्या नडेला(Satya Nadela) यांच्या मुलाचे सोमवारी सकाळी निधन झाले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्या मुलाचे नाव झैन नडेला(Zain Nadela) असे होते. त्याला जन्मापासून सेरेब्रल पाल्सी नावाचा आजार होता. मृत्यूच्या वेळी झैन नडेला अवघे २६ वर्षांचे होते.(microsoft ceo satya nadela son died)
सत्या नडेला यांच्या मुलाचे निधन झाल्याची माहिती मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे दिली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये नडेला कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. २०१४ मध्ये सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीच्या CEO हा पदभार स्वीकारला होता.
पदभार स्वीकारल्यापासून सत्या नडेला यांनी अपंग वापरकर्त्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी उत्पादने डिझाइन करण्यावर भर दिला होता. याकरिता सत्या नडेला यांनी आपला मुलगा झेनचं उदाहरण देखील दिलं होतं. गेल्या वर्षी, अपंग वापरकर्त्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी नडेला यांनी द चिल्ड्रन्स हॉस्पिटलशी जोडले गेले होते.
द चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये झैन नडेलावर उपचार करण्यात येत होते. या हॉस्पिटलमध्ये नडेला यांनी एंडॉव्ड चेअर इन पेडियाट्रिक न्यूरोसायन्सेसची स्थापना केली होती. मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी मुलाच्या उपचारासाठी खूप प्रयत्न केले होते. पण त्यांना यश आले नाही. सोमवारी सकाळी सत्या नडेला यांचे पुत्र झैन नडेलांचे निधन झाले.
चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे सीईओ जेफ स्पिरिंग यांनी झैनबद्दल माहिती देताना लिहिले की, “झैनला संगीताची फार आवड होती. झैनचे हास्य आणि आपल्या कुटुंबासाठी त्याने दिलेला आनंद कायमच लक्षात ठेवला जाईल.” हा संदेश चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे सीईओ जेफ स्पिरिंग यांनी आपल्या संचालक मंडळातील सदस्यांना दिला होता.
सेरेब्रल पाल्सी हा मेंदूसंदर्भातील एक आजार आहे. हा आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये मेंदूचा विकास व्यवस्थित होत नाही. या आजाराने ग्रस्त असणारी मुले शिकण्यास सक्षम नसतात. या आजारात मुलांची दृष्टी कमकुवत होते. तसेच या आजारामध्ये मुले ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता देखील गमावतात. या आजारात मुलांच्या चालण्याचा क्षमतेवर देखील परिणाम होतो.
महत्वाच्या बातम्या :-
जगातील सर्वात मोठी आणि शक्तिशाली सेना कोणत्या देशाकडे आहे? वाचून आश्चर्य वाटेल
अभ्यासाला कंटाळलेय पण ते माझ्या मृत्यूचं कारण नाही, विद्यार्थिनीने स्वत:च्याच मृत्यूचं गूढ वाढवलं; चिठ्ठीतून वेगळाच खुलासा
शास्रींनी बाहेर बसवलेला ‘हा’ जबरदस्त खेळाडू आता मात्र एकहाती सामने जिंकवत गाजवतोय मैदान