एकेकाळी भारताची शान असणाऱ्या मायक्रोमॅक्सने पुन्हा घेतली दमदार एन्ट्री; दोन स्मार्टफोन लॉन्च

  1. काही वर्षांपूर्वी मायक्रोमॅक्स ही भारतात स्वस्त आणि दर्जेदार स्मार्टफोनसाठी लोकप्रिय कंपनी होती. पण चिनी कंपन्यांच्या आक्रमणामुळे मायक्रोमॅक्सला उतरती कळा आली होती. भारतीय स्मार्टफोन ब्रँड मायक्रोमॅक्स दोन वर्षांहून अधिक कालावधीनंतर दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणली आहेत. नव्या मोबाइलसह भारतात दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे.

कंपनीने काल ऑनलाइन कार्यक्रमात दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. हे फोन मध्यम श्रेणी आणि बजेटमध्ये बसणारे स्मार्टफोन आहेत. ज्यामध्ये पहिला फोन इन नोट 1 आहे तर दुसरा फोन आयएन 1 बी ( IN 1B)आहे जो एंट्री लेव्हल सेगमेंटचा स्मार्टफोन आहे.

इन नोट 1 ची किंमत १०,९९९ रुपयांपासून सुरू होईल. या फोनमध्ये आपल्याला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल. तर १२८ जीबी मेमरी असणाऱ्या फोनची किंमत १२,९९ रुपये असेल. मायक्रोमॅक्स IN 1B ची किंमत ६,९९९ असेल. या फोनमध्ये २ जीबी रॅमसह ३२ जीबी मेमरी असेल. तर ४ जीबी रॅमसह ६४ जीबी स्टोरेज असलेल्या दुसर्‍या व्हेरिएंटची किंमत ७,९९९ रुपये असेल.

मायक्रोमॅक्स इन नोट 1 मध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी एलसीडी डिस्प्ले आहे. तसेच फोनमध्ये मागे तीन कॅमेरे मिळतील. ज्यामध्ये प्राइमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सेलचा आहे, दुसरा २ मेगापिक्सेलचा आणि तिसरा २ मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सिंग कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे.

तर मायक्रोमॅक्स IN 1B स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन रियर कॅमेरे आहेत. प्राइमरी १३ मेगापिक्सलचा आणि दुसरा २ मेगापिक्सेलचा डेथ सेन्सिंग कॅमेरा आहे. या फोनची बॅटरी 5000mAh आहे. हे दोन स्मार्टफोन मायक्रोमॅक्सच्या ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करू शकता. याशिवाय ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरूनही खरेदी करता येईल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.