पॉर्न स्टार मिया खलिफा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा फोटो पोस्ट करुन म्हणतीये….

मुंबई | केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे. तर आता रिहानानंतर एकेकाळी पॉर्नस्टार म्हणून काम केलेल्या मिया खलिफाने शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.

मिया खिलफाने शेतकरी आंदोनाला पाठिंबा देत एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ती म्हणतीये, “मानवी हक्काचे उल्लंघन होत आहे. त्यांनी दिल्लीत इंटरनेट सेवा खंडीत केली” आहे. यासोबतच तिने आंदोलनाचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात एका माणसाच्या हातात शेतकऱ्यांची हत्या थांबवा असा फलक आहे.

शेतकरी आंदोलनाला इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने दिला पाठिंबा…
रिहानाने शेतकरी आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट करत याकडे सगळ्याचे लक्ष वेधले आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचे ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असे तिने लिहले आहे.

तसेच पुढे रिहानाने ट्विट करताना ‘#FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला आहे. रिहानाने ट्विट केलेल्या बातमीमध्ये दिल्लीमध्ये आंदोलनावेळी परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याची बातमी देखील देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
रात्री बाथरूममध्ये घुसून विधवा वहीनीवर दिराने केला बलात्का.र
नामांतराच्या मुद्यावरून मनसे आक्रमक, शिवसेना नेत्याची गाडी अडवत विचारला जाब
अभिमानास्पद! गवंड्याची मुलगी झाली केंद्रीय पोलिस दलामध्ये भरती, आई-वडीलांचे पाणावले डोळे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.