वाचा पॉर्न इंडस्ट्रीचे काळे सत्य; अभिनेत्रींनी इंडस्ट्री सोडली तरी का होते जगणे कठीण, मिया खलिफाने केले सत्य उघड

 

 

देशात सध्या शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समर्थनासाठी पुर्व पॉर्नस्टार मिया खलिफा उतरली आहे. त्यामुळे अनेक लोक तिला तिच्या भुतकाळाची आठवण करून देत तिच्यावर टिका करत आहे.

तिला पॉर्न इंडस्ट्री सोडून आता सहा वर्षे झाली असली तरी आजही तिला समाजाकडून टोमणे मिळत असतात. तिला तिच्या जुन्या गोष्टी आठवूण दिल्या जातात, पण आज इतके वर्ष झाले असतानाही तिला जीवण जगने कठीण झाले आहे.

तिने जेव्हा अडल्ट इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री घेतली होती तेव्हा काही व्हिडीओमध्येच ती त्या इंडस्ट्रीची सुपरस्टार झाली होती. तिने पहिला व्हिडीओ हिजाब घालून शुट केला होता. हि फिल्म ब्लॉकबास्टर ठरली.

त्या व्हिडीओमुळे तिच्या कुटूंबाने तिच्याशी असणारे नाते तोडून टाकले. तिच्यावर धर्माचा अपमान केल्याचा आरोप लावण्यात होता. त्यानंतर तिला कळाले की अशा पद्धतीने नाव कमवण्याचा काही उपयोग नाही.

मियाचा जन्म लेबनानमध्ये झाला होता. पण देशात युद्ध झालेले असल्यामुळे तिचे पुर्ण कुटूंब अमेरिकेत स्थायिक झाले. मियाने पॉर्न इंडस्ट्रीत ऑक्टोबर २०१४ मध्ये पदार्पण केले होते. तिने तिचा पहिलाच व्हिडीओ हिजाब घालून शुट केला होता आणि जानेवारी २०१५ मध्ये तिने या इंडस्ट्रीला सोडून दिले होते.

तिने एका मुलाखतीत म्हटले होते की. तिने फक्त तीन महिनेच पॉर्न फिल्मची शुटींग केली होती. त्या शुटींगमधूल तिने फक्त काही हजार डॉलर्सचीच कमाई केली होती. या गोष्टीला सहा वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले असले तरी तिचा भुतकाळ अजूनही तिचा पाठलाग करत आहे.

तिने नुकतेच लेबनान रेडक्रॉसमध्ये दान केले होते, पण या गोष्टींकडे समाजाने दुर्लक्ष केले. आजही तिच्या व्हिडीओंमुळे तिला समाजाकडून होत असलेला अपमान सहन करावा लागतो.

मियाने ती इंडस्ट्री सोडली असली तरी आजही तिला समाजात पॉर्नस्टार म्हणूनच ओळखले जाते. मिया खलिफाला लोकांच्या विचारात बदल करायचा आहे, तिला इतके ट्रॉल केले असले तरी तिने लोकांना शांततेत दिलेल्या उत्तरामुळे ती लवकरच आपली नवीन ओळख बनवण्यात यशस्वी होईल असे दिसून येते.

लोकांचे पॉर्न इंडस्ट्रीबाबत अनेक गैरसमज आहे. त्यातलाच एक गैरसमज असा आहे, की यात काम करणाऱ्या अभिनेत्र्यांना खुप पैसे मिळत असतील पण हे सर्व साफ खोटे आहे. खरंतर हि इंडस्ट्री वनवे सारखी आहे. यामध्ये एक नियम असा आहे की एखादी व्हिडीओ शुट झाली आणि वेबसाईट्सवर गेली, तर ती व्हिडीओ पुन्हा हटवण्यात येणार नाही. त्यामुळे पॉर्नसाईट्स कित्येक वर्षे त्या व्हिडीओपासून पैसे कमवतात.

त्यामुळे अनेक मॉडेल अशा आहेत ज्यांनी कित्येक वर्षे झाली ही इंडस्ट्री सोडली आहे, तरी त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर तसेच आहे. असे अनेक उदाहरणे आहे.

पॉर्न इंडस्ट्रीत काम करणाऱ्या स्किन डायमंड यांनीही एक किस्सा सांगितला आहे. तिच्या ओळखीच्या असणाऱ्या एका मॉडेलने ही इंडस्ट्री सोडली आणि एका दवाखान्यात नर्सचे काम सुरु केले. जेव्हा लोकांना तिच्या भुतकाळाबद्दल कळले. तेव्हा तिला काढून टाकण्यात आले.

अनेक पॉर्नस्टार आपल्या घरी जात नाही कारण सोसायटी त्यांना स्विकारत नसते. अनेकदा पार्टनर मिळत नाही. त्यामुळे अनेक मॉडेल खुप कमी वेळात या इंडस्ट्रीला रामराम ठोकतात.

२०१८ मध्ये झालेल्या एका अहवालानुसार, एक अभिनेत्री टिपीकल सेक्ससीनसाठी ८०० ते १०० हजार डॉलर मिळतात. अनेकदा अभिनेत्री नवी असेल तर तिला फक्त ३०० डॉलर दिले जातात. हे सर्व पैसे त्यांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठीच जात असतात.

अनेकदा या अभिनेत्रींना आपल्या भविष्याची चिंता सतावत असते. ४० वर्षांनंरत त्यांना काम मिळणेही बंद होते. त्यामुळे अनेक मॉडेल्स अर्ध्यातच ही इंजस्ट्री सोडून जातात, असे असले तरी त्यांना लोकांच्या टिकेचा आयुष्यभर सामना करावा लागतो.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.