आयपीएलमध्ये खेळवावी लागली चक्क ४४ ओव्हर्सची मॅच; का कराव लागलं असं? वाचा..

 

नवी दिल्ली | सध्या आयपीएलचे (इंडियन प्रीमियर लीग) तेरावे सीजन दुबईमध्ये सुरू आहे. २०२० मध्ये अनेक अनपेक्षित गोष्टी घडत असताना यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्याला असेच काही पाहायला मिळत आहे.

आयपीलचा काल (रविवार) झालेला मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब सामना आयपीएल चाहते कधीच विसरू शकणार नाही. कारण या सामन्यात चक्क २ सुपरओव्हर खेळण्यात आल्या आहे. क्रिकेट इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे.

काल झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने बाजी मारत २ गुण मिळवत गुणतालिकेच्या सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे, तर मुंबई इंडियन्स १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

मुंबईने पंजाबला विजयासाठी १७७ धावांचे लक्ष दिले होते मात्र पंजाबने १७६ धावा केल्याने सामना बरोबरीचा झाला. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली. पण पहिल्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने फलंदाजी करत ५ धावा केल्या आणि मुंबईने देखील ५ धावा केल्या त्यामुळे ही सुपर ओव्हर बरोबरीची झाल्याने दुसरी सुपर ओव्हर घेण्यात आली.

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने मुंबईवर विजय मिळवला. झालेल्या सामन्यात दोन वेळा सुपर ओव्हर झाल्याने २०-२० असणारा सामान्यात चक्क ४४ ओव्हर बघायला मिळाल्या. त्यामुळे आयपीएल चाहत्यांसाठी कालचा रविवार ‘डबल धमाल संडे’ ठरला आहे.

दरम्यान, कालच्या डबल हेडरमध्ये पहिला सामना सनराईझर्स हैद्राबाद आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यात झाला होता. यांचाही सामना बरोबरीने सुटल्याने या सामन्यातही सुपर ओव्हर झाली होती. या सुपर ओव्हरमध्ये कोलकताने विजय मिळवला. त्यामुळे आयपीएल चाहत्यांना काल एका दिवसात ३ सुपर ओव्हर पाहायला मिळाल्या.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.