मुंबई| प्रसिद्ध मसाला कंपनी महाशिया दी हट्टी (MDH) चे मालक महाशय धर्मपाल गुलाट यांचे भारतातच नव्हे तर जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. त्यांनी ३ डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.
महाशय धर्मपाल गुलाटी हे करोडोंची प्राँपर्टी मृत्यूपश्चात सोडून गेले आहे. आज आपण त्यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत. गुलाटी यांचा जन्म २७ मार्च, १९२३ मध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. १९४७ च्या फाळणीमध्ये ते भारतात आले होते. तेव्हा त्यांच्याकडे केवळ १५०० रुपये होते. भारतात आल्यावर त्यांनी उदरनिर्वाहासाठी टांगा चालवायला सुरुवात केली होती.
MDH म्हणजे महाशियान दी हट्टीची स्थापना १९१९ मध्ये भारताचा अविभाज्य घटक असलेल्या सियालकोट क्षेत्रमधील चुन्नी लाल गुलाटी यांनी केली होती. अनेक वर्षे त्यांनी छोट्या कंपनीचे रूपांतर मोठ्या कंपनीमध्ये करण्यासाठी खूप कष्ट केले आहेत. यामागे त्यांचा एकच हेतू होता की, सुगंधित भारतीय मसाल्याचे योग्य मिश्रण.
या कंपनीने ६४ प्रोडक्ट बाजारात आणले त्यात मिट मसाला कस्तुरी मेथी, गरम मसाला, राजमा मसाला, दाल मखणी मसाला, भाजी मसाला इ. प्रॉडक्ट आहेत. ६४ प्रॉडक्ट काढल्यानंतर या कंपनीने २०१७ मध्ये ९२४ करोड रुपयांचा नफा कमावला होता. १०० पेक्षा जास्त देशात या मसाल्यांची निर्यात होते.
वाचा महाशय धर्मपाल गुलाट यांची ऐकून प्राँपर्टी….
दिल्लीत आल्यानंतर त्यांनी १५०० रूपयापैकी ६५० रूपयांमध्ये एक टांगा आणि घोडा खरेदी केला. स्टेशन परिसरात ते टांगा चालवू लागले. काही दिवसांनी त्यांनी आपल्या भावाला टांगा देऊन करोलबाग परिसरातील अजमल खां रोडवर मसाले विकण्यास सुरूवात केली.
यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. १९५९ मध्ये दिल्लीतील किर्तीनगर परिसरात गुलाटी यांनी सर्वात पहिली कंपनी सुरू केली. त्यानंतर अजमल खां रोडवर त्यांनी दुसरी कंपनी सुरू केली. ६० च्या दशकात एमडीएचचं करोल बाग परिसरातील दुकानाने प्रसिद्धी मिळवली होती. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये त्यांचे मसाले पोहोचले आहेत.
दरम्यान, एकेकाळी त्यांच्याकडे १ हजार ५०० रूपये होते. परंतु आज ते तब्बल ५ हजार ४०० कोटी रूपयांचे मालक आहेत. गुलाटी यांना यापूर्वी पद्मभूषण या पुरस्कारनंही सन्मानित करण्यात आलं होते.
महत्त्वाच्या बातम्या
डॉ. शीतल आमटे आत्मह.त्या प्रकरणात धक्कादायक माहिती; कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्मह.त्या?
दिलजीत आला शेतकऱ्यांसाठी धावून; एक कोटींची मदत करत केंद्र सरकारला केली ही विनंती
लसीचा डोस घेतल्यानंतरही करोना का झाला? भारत बायोटेकने सांगितलं कारण…
वाह अजितदादा वाह! ती शपथ विसरलात?, भाजपचा सवाल