खूशखबर! मुंबईमध्ये म्हाडा तब्बल साडेअकरा हजार घरांसाठी लॉटरी काढणार

स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी सरकार विविध योजना राबवून घरे देण्याचा प्रयत्न करत असते. म्हाडाने मुंबईकरांसाठी गोड बातमी आणली आहे. लवकरचं ११५०० घरांची लॉटरी निघणार असल्याचं सांगितलं आहे.

याआधी २५०० घरे म्हाडाकडून देण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. पण म्हाडाने घरांची संख्या ४०००च्या वर वाढवलेली आहे. पण याची लॉटरी दिवाळीमध्ये निघणार आहे. तर ७५०० घरांच्या लॉटरीची घोषणा करत कोकण मंडळाने मार्चमध्ये जाहिरात काढण्याचे जाहीर केले आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डिसेंबर महिन्यात गोरेगाव येथील २५०० घरांची लॉटरी निघेल आणि जाहिरात जानेवारी महिन्यात निघेल असं सांगितलं होतं. पण फेब्रूवारी महिना संपत आला तरी त्याची जाहीरात काही निघाली नव्हती.

गेल्या १३ वर्षांपासून दरवर्षी म्हाडाच्या घरांची लॉटरी निघाली होती फक्त एक वर्ष निघाली नव्हती. शेवटची सोडत २०१९ मध्ये निघाली होती. त्यानंतर कोरोनामुळे गेल्या वर्षीची सोडत रखडली होती.
महत्वाच्या बातम्या-
गूगल मॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच इस्त्रो आणणार स्वदेशी मॅप; जाणून घ्या फायदे
केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेत शेतकऱ्यांना मिळणार ३६,००० रुपये पेन्शन, असा करा अर्ज..
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर; कांद्याचे दर आणखी वाढणार

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.