मेथी उत्पादनाचा खर्च ४४४० आणि मिळाले २९५०; शेतकऱ्याचा विदारक अनुभव

सध्या भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घसरले असून मेथी, शेपू आणि कोथींबिर अवघे एक ते तीन रूपये प्रति जुडी असा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

आठ दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये प्रति जुडी विकली जाणारी मेथी सध्या केवळ ५ रुपये इतक्या कमी किमतीत विकली जात आहे. मालाला हमीभाव मिळत नसल्याने अवस्था वाईट झाली आहे. असाच एक विदारक अनुभव शेतकरी जनार्दन शेलार सांगत आहेत.

जनार्दन शेलार यांना मेथी पिकवायला ४४०० रुपये खर्च आला. पण मेथीची भाजी विकून त्यांना २९५० रुपये मिळाले. यातून शेलार यांना तब्बल एक हजार ४५० रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

तसेच जनार्दन शेलार यांनी आपल्या शेतात दहा गुंठे भाजी केली होती. भाजीलागवडीपासून, बियाणे खरेदी, मजुरी, गाडीभाडेपासून विक्रीसाठी नेईपर्यंत त्यांना ४४०० रुपये खर्च आला व भाजी विकून त्यांना २९५० रुपये मिळाले. त्यांना एक हजार ४५० रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

भाजप मंत्र्याना डिनरसाठी नकार देणे विद्या बालनला पडले महागात, शुटिंग पाडले बंद

रागारागात धरम पाजीला मारायला सेटवर गेला होता संजय दत्त; पण धर्मेंद्रने मात्र…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.