बुलेट लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! रॉयल एनफिल्डची शानदार meteor 350 बाईक लॉन्च, किंमत फक्त…

रॉयल एनफिल्ड आपल्या बाईक्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून बुलेटची क्रेझ अजूनही तशीच आहे. आता पुन्हा एकदा या कंपनीने आपली बहुचर्चित meteor 350 बाईक लॉन्च केली आहे.

६५० ट्विन्सनंतर ही बाईक रॉयल एनफिल्डसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. ही बाईक नव्या बीएस ६ इंजिनसह ग्लोबल प्रॉडक्टच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे. ही बाईक तीन variant मध्ये उपलब्ध आहे.

फायरबॉल, सुपरनोव्हा, स्टेलर हे तीन variant आहेत. या बाईकचा लुक जर तुम्ही पहिला तर तो जवळपास thunderbird 350x सारखाच आपल्याला भासेल. या बाईकमध्ये नवीन device console सेट-अप आणि split seat डिजाइन देण्यात आली असून हीच्या headlight आणि talelightमध्येही बदल करण्यात आले आहेत.

डिझाईनच्या बाबतीत या बाईकमध्ये tear-drop शेप्ड इंधन टॅन्क, bright colour option, LED light आणि एका split seat मध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये नवीन फ्रेम आणि नवीन ३५० सीसी इंजिन देण्यात आले आहे.

हे इंजिन पूर्वीपेक्षा जास्त टॉर्क आणि पॉवर निर्माण करेल असा कंपनीचा दावा आहे. तसेच एक मिडीयम टीएफटी डिस्प्ले, मेन युनिट जे ट्रिप मीटर आणि इतर डिटेल्ससाठी ॲनालॉग स्पीडोमीटर एलईडी पॅनल देण्यात आले आहे.

तसेच smartphone connectivity सह digital analog instrument cluster आणि नवीन टीएफटी डिस्प्लेमध्ये turn by turn nevigation system देण्यात आली आहे. आता सगळ्यात महत्वाचे या बाईकची किंमत १.५ ते २ लाख रुपये इतकी आहे. अनेक तरुण या बाईकची वाट पाहत होते.

महत्वाच्या बातम्या
गौतम गंभीर प्रमाणेच रोहित शर्माचीही कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला जातोय?
एक रूपयाची नोट विका आणि लखपती व्हा; जाणून घ्या सविस्त
पुनम पांडेने धरणावर विवस्र व्हिडीओ शुट केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
तारक मेहतात येणार नवीन दयाबेन; जुन्या दयाबेनपेक्षा प्रचंड सुंदर आणि स्टाईलिश आहे ही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.