मुंबई । बॉलीवूडमधील अनेक जोडप्यांचे वेगवेगळे किस्ये ते त्यांच्या चाहत्यांमध्ये शेअर करत असतात. असाच एक किस्सा अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखने द कपिल शर्मा शो मध्ये शेअर केला आहे.
त्यांचे गोड नाते हे जगजाहीर आहे. मात्र यांच्यातील हे नाते रितेशच्या एका चुकीच्या मेसेजमुळे लग्नापूर्वीच संपुष्टात येणार होते. रितेशने १ एप्रिलच्या बहाण्याने जेनेलियाला आपले नाते इथेच थांबवूया असा मेसेज पाठवला.
हा मेसेज त्याने पहाटे 4 वाजता पाठवला होता. मात्र शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे जेनेलियाने हा मेसेज 7 वाजता पाहिला आणि तो पाहून तिला धक्काच बसला. तिने तात्काळ आपला फोन स्विच्ड ऑफ देखील करुन टाकला. मात्र रितेशच्या हे लक्षात आले नाही.
त्याने जेनेलियाला कॉल करुन सांगितले की काय झाले. त्यावर तिने त्याला घडलेला प्रकार सांगितला. त्यावर तो म्हणाला अरे मी एप्रिल फुल करत होतो. त्यावर जेनेलिया अचंबित झाली. थोडक्यात रितेशने केलेला मेसेज हे त्यांचे नाते संपुष्टात आणण्यासाठी कारणीभूत ठरणार होते. मात्र रितेश अगदी थोडक्यात वाचला. नाहीतर त्याची ही मस्करी त्याच्या चांगलीच अंगलट येणार होती.
त्यांचा विवाह २०१२ मध्ये झाला. आपल्या चित्रपटातून झालेली ओळख, त्यातून झालेली मैत्री आणि नंतर आयुष्यभरासाठी एकमेकांशी लग्नगाठीत जोडले हे गेलेले हे क्युट कपल. याचे अनेक मजेशीर व्हिडिओ आपल्याला सोशल मिडियावर पाहायला मिळतात.