आमचे सरकार असतानाही कुठे झाले एसटीचे विलिनीकरण? जानकरांच्या वक्तव्याने भाजप तोंडावर आपटली

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. हे कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम असल्याने एसटी संपाबाबत अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही, राज्य सरकारने यावर एकत्रितपणे तोडगा काढण्याचे आवाहनही केले आहे. त्यामुळे आतातरी एसटी संपावर नेमका काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान माजी मंत्री महादेव जानकर यांनी यावर आता मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी भाजपला घरचा आहेर दिल्याने आता चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, आमचे सरकार होते तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही हे कुठे झाले..?, रोडवर बोलतांना एक असतं आणि आत गेल्यावर वेगळं असते. सिस्टीमचा भाग असतो, त्याप्रमाणे जावे लागते.

म्हणून जनतेने हुशार झाले पाहिजे, हा त्यावरील एक पर्याय असल्याचे महादेव जानकर म्हणाले. यामुळे भाजपने त्यांना काहीसे बाजूला केल्यानंतर त्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. यामुळे याची सध्या चर्चा रंगली आहे. भाजपने यावर अजूनही प्रतिक्रिया दिली नाही.

आमच्या काळातही एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा काय झाले नाही, जनतेने हुशार होणं हाच मार्ग असल्याचे महादेव जानकर म्हणाले. यामुळे यावर आता काय होडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महादेव जानकर यांनी भाजपला एक प्रकारे घरचा आहेर दिला असल्याचे बोलले जात आहे. महादेव जानकर यांना भाजपने लांब केले आहे. कार्यकर्त्यांमधून अशा प्रकारे प्रतिक्रिया देखील येत आहेत. राजकीय मैदानातून गेल्या काही दिवसांपासून जानकर हे लांब आहेत.

दरम्यान, मुंबई आझाद मैदानावर याबाबत आंदोलन सुरू आहे. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने गेल्या 8 पेक्षा अधिक दिवसांपासून एसटी ठप्प झाली आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या असल्या, तरी विलीनीकरणाबाबत अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. कोर्टात देखील हे प्रकरण गेले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.