‘मेरे सैंया सुपरस्टार’ गाण्यावर डान्स केलेल्या त्या नवरीचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल

सध्याच्या विवाह सोहळ्यामध्ये अनेक नव-नवीन ट्रेंड पाहायला मिळतात. कधी नवरी नवऱ्यासाठी डान्स करायला मिळते तर कधी घरचे नवरा-नवरीसाठी डान्स करतात. याही पलीकडे जाऊन एक नवीन गोष्ट ऐकायला मिळते ती म्हणजे नवऱ्यानेनवरीच्या प्रेमाखातर गळ्यात मंगळसूत्र घातल. अश्या अनेक नवीन गोष्टी ऐकायला आणि पाहायला मिळतात.

काही महिन्यांपूर्वी म्हणजेच 30 नोव्हेंबर 2020 रोजी एका लग्नातील नवरीचा एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्या जोडीच नाव म्हणजे संकेत शिंदे आणि श्वेता ताजणे. श्वेताने आपल्या पतीसाठी म्हणजे संकेत साठी लग्न मंडपात डान्स करत आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करत एन्ट्री केली होती. त्या व्हिडिओला खूप मोठ्या प्रमाणात पसंदी मिळाली होती.

खर तर मुलीने आपल्याच लग्नात नाचलेल पाहण्याची अनेक लोकांची मानसिकता नसते. पण म्हणतात ना हौसेला मोल नसत. आणि श्वेताने स्वतः नवरी असून डान्स करण्याच धाडस दाखवल आणि अनेकांनी तीच कौतुक देखील केल. ‘मेरे सैय्या सुपरस्टार’ या गाण्यावर श्वेताने केलेला डान्स व्हिडिओला काही दिवसातच लाखो लोकांनी पहिला होता.

आता श्वेता परत एकदा सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत असून तिचा आणखी एक डान्स आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र ‘पुण्याची मैना’ या गाण्याचा ट्रेंड चालू असून श्वेताने याच गाण्यावर केलेल्या डान्स व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. तिचा हा डान्स लाखो लोकांना पसंद आला आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की श्वेता एक उत्तम डान्सर आहे, आणि तिला आवडही आहे.

मुळची जुन्नर येथील असणाऱ्या श्वेताच शिक्षण पूर्ण होताच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. श्वेताचा नवरा संकेत इंजिनिअर असून एका कंपनीत जोबला आहे. श्वेताच्या लग्नातल्या डान्समुळे अनेक लोकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु मला काही फरक पडला नाही कारण माझी सासू आणि पती मला सपोर्ट करतात असे तिने सांगितले. संकेत व श्वेता यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

हे ही वाचा-

उत्तरप्रदेशात कोरोना चाचण्या निगेटीव्ह येण्यामागे आहे सरकारचा हा ‘झोल’; वाचून तुम्हीही हादराल

साऊथचा सुप्रसिद्ध कलाकार अल्लू अर्जुन;या चित्रपटामुळे झाला फेमस; जाणून घ्या आयुष्याला कलाटणी देणारा चित्रपट

जास्तीची हाव न ठेवता चंद्र आहे साक्षीला मालिका झाली बंद; जाणून घ्या त्यामागचे कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.