राज कुंद्राच्या कंपनीत पुरुषांचं देखील शोषण होत; ‘या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

मुंबई। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात चांगलाच होरपळून निघत आहे. राज विरुद्ध काही पुरावे मिळतायत का यासाठी मुंबई पोलीस कसून तपास करत आहेत. तर दुसरीकडे आता अनेक अभिनेत्री आता राज विरुद्ध आवाज उठवत आहेत. त्यामुळे हे प्रकरण रोज नवीन नवीन वळण घेत आहे.

अशातच आता अजून एका अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. राज कुंद्राच्या कंपनीत पुरुषांचं देखील शोषण होत असल्याचे धक्कादायक खुलासे राज कुंद्राच्या हॉटशॉट अ‍ॅपसाठी आणि अडल्ट सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री जोया राठोडने हीने केले आहेत.

राज कुंद्राला बॉलिवूडप्रमाणे पॉर्न इंडस्ट्रीला मोठं बनवाचं होतं असं जोया म्हणाली. अनेक तरुण तरुणींचा वापर करून आपलं नाव कुठेही पुढे न येता राज कुंद्राला बॉलिवूडप्रमाणे पॉर्न क्षेत्र मोठं बनवायचं होतं . त्यामुळे आता प्रकरण नवीन वळण घेण्याची शक्यता आहे.

जोया राठोडनं दिलेल्या एका मुलाखती दरम्यान राज कुंद्रा विरोधात खुलासे केले व ती म्हणाली, “मी कधी राज कुंद्राला भेटले नाही किंवा त्याच्याशी बोलले नाही. मात्र त्याच्या ऑफिसमधून उमेश कामतचा फोन आला आणि त्याने तो हॉटशॉट अ‍ॅपचं काम सांभाळत असल्याचं म्हणाला. ” अश्लील सिनेमात काम करण्यासाठी उमेशने दररोज २० हजार रुपये मिळतील अशी ऑफरजोयाला दिली होती.

अटक होईपर्यंत तो जोयाला सतत कॉल करत होता असं ती म्हणाली. त्यानंतर हॉटशॉट अ‍ॅपसाठी काम करणाऱ्या एका रॉय नावाच्या व्यक्तीने देखील झोयाला अश्लील सिनेमांमध्ये काम करण्यासाठी फोन केल्याचं ती म्हणाली रॉयने जोयाला दररोज ७० हजार रुपये मिळतील अशी ऑफर दिली असं जोया म्हणाली.

मात्र त्यानंतर तिने एक मोठा व धक्कादायक खुलासा केला. ती म्हणाली की, राज कुंद्राच्या कंपनीत पुरुषांचं देखील शोषण केलं जात. जे तरुण अगंप्रदर्शन करण्यास तयार नसतात त्यांना काम मिळत नाही. मालिकांमध्ये, नाटकांमध्ये काम करणारी अनेक तरुण मुलं ऑडिशनसाठी येतात.

जर त्यांनी असे सीन नाही दिले तर त्यांना काम मिळणार नाही असं सांगितलं जात. आधी फोनवर मुलांना ५ हजार मिळतील असं सांगितलं जात, मात्र आल्यावर मुलाना सेक्स सीन दिल्यास १५ हजार मिळतील असं सांगितलं जात होत असं जोया म्हणाली.
महत्वाच्या बातम्या
दुधात भेसळ आहे की नाही हे घरबसल्या ओळखू शकतात तुम्ही; काही मिनिटांतच कळेल भेसळयुक्त आहे की शुद्ध
“सेना भवनापर्यंत स्वतःच्या पायावर याल, पण जाताना खांद्यावरच जावं लागेल, खांदेकरी घेऊन या” 
पांड्या बंधूंनी मुंबईत घेतले ३० कोटींचे घर; एकेकाळी मॅगी खाऊन दिवस काढत होते
गृहमंत्री वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात भरदिवसा हत्या; सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात घातल्या गोळ्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.