Share

संशोधकांना मोठं यश, प्रेग्नेंसी टाळण्यासाठी आता महिला नाही तर पुरूष घेणार गर्भनिरोधक गोळी

prevent pills

प्रेगन्सी टाळण्यासाठी अनेकदा महिला सेक्सनंतर गर्भनिरोधक गोळ्या घेतात. प्रेगन्सी टाळण्यासाठी सध्या अनेक वैद्यकीय पर्याय आहेत. पुरुष यासाठी कंडोमचा वापर करतात. स्त्रियांसाठी गर्भनिरोधक गोळ्या असतात. तशाच गोळ्या आता पुरुषांसाठी देखील उपलब्ध होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. वैज्ञानिक यासंदर्भात संशोधन(Research) करत आहेत.(men take birth control pills scientist)

वैज्ञानिक पुरुषांसाठी अशी गोळी तयार करत आहेत की जिच्यामुळे स्त्रियांना प्रेगन्सी होणार नाही. या गोळीमुळे पुरुषांच्या वीर्यावर परिणाम होणार आहे. जन्म नियंत्रणासाठी सध्या कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या वापरण्यात येतात. पण गर्भनिरोधक गोळ्यांचा जास्त प्रमाणात वापर केल्यास त्याचे शरीरावर साइड इफेक्ट देखील होतात.

स्त्रियांना प्रेगन्सी टाळण्यासाठी अनेकदा गर्भनिरोधक गोळ्या नाइलाजाने घ्याव्या लागतात. पण आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या तयार करण्यात येत आहेत. वैज्ञानिक या गोळ्यांवर संशोधन करत आहेत. वैज्ञानिकांनी यासंदर्भात संशोधन करत असताना एक प्रयोग देखील केला आहे. उंदरांवर हा प्रयोग करण्यात आला आहे.

हा प्रयोग ९९ टक्के परिणामकारक ठरला आहे. अद्याप या गोळ्यांचा कोणताही दुष्परिणाम दिसून आलेला नाही. हे संशोधन एंजलिस बायोमेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ऍण्ड युनिव्हर्सिटी ऑफ वाशिंग्टनचे वैज्ञानिक करत आहेत. या गोळ्या प्रेगन्सी टाळण्यासाठी परिणामकारक ठरतील, असा दावा त्या वैज्ञानिकांनी केला आहे.

या गोळीबाबत माहिती देताना वैज्ञानिकांनी सांगितले की, “या गोळीमुळे पुरुषांमधील वीर्य रोखण्यास मदत होणार आहे. या गोळीमुळे सेक्सनंतर जोडीदार महिलेला प्रेगन्सी होण्याची शक्यता ९९ टक्क्यांनी कमी होणार आहे. या गर्भनिरोधक गोळीवर सध्या पुढील संशोधन सुरु आहे”, असे वैज्ञानिकांनी सांगितले आहे.

ही गोळी इतर प्रकारच्या गोळ्यांपेक्षा वेगळी आहे कारण ती एक नॉन-हार्मोनल गर्भनिरोधक आहे, जी हार्मोनल बदल घडवून आणण्याऐवजी, व्हिटॅमिन ए च्या परस्परसंवादाला लक्ष्य करते. २०२२ या वर्षात या गोळीच्या मानवी चाचण्यांची सुरवात केली जाणार आहे. त्यानंतरच ह्या गोळ्या बाजारात उपलब्ध केल्या जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! ७३६ दिवसांनंतर महाराष्ट्र झाला मास्कमुक्त, जाणून घ्या कोणकोणते निर्बंध हटवले
जॉन अब्राहम साऊथ इंडस्ट्रीवर भडकला, म्हणाला, मी हिंदी चित्रपटाचा हिरो आहे आणि..
नराधमांनी मुक्या जीवालाही सोडलं नाही; गरोदर बकरीवर केला सामूहिक बलात्कार, अशी झाली पोलखोल

ताज्या बातम्या आरोग्य

Join WhatsApp

Join Now