भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामने होणार आहेत. त्यातील तिसरा सामना सध्या चालू आहे. सिडणीमध्ये हा सामना चालू आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव भारताने ३३८ धावांमध्ये रोखला. तर भारताने दुसऱ्या दिवस संपल्यानंतर २ बाद ९६ धावा केल्या आहेत.
भारताला ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्यासाठी २४२ धावांची गरज आहे. भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्माने ७० धावांची सलामी दिली. गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीतले पहिले अर्धशतक ठोकले आहे. कमिन्सने त्याला बाद करण्याच्या आधी त्याने ५० धावा केल्या होत्या.
दुखापतीनंतर पहिला सामना खेळत असलेल्या रोहित शर्माने २६ धावांची समाधानकारक खेळी केली आहे. एकीकडे क्रीडाप्रेमी रोहित पुन्हा आल्याने आनंदी आहेत तर दुसरीकडे रोहितच्या फलंदाजीवर शंका उपस्थित करणाऱ्या काकांची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
तर झाले असे होते की एका ट्विटर युझरने रोहित शर्माला अंतिम ११ मध्ये प्रवेश देण्यासाठी कोणाला डच्चू देण्यात यावा? असा प्रश्न केला होता. याला उत्तर देताना एका काकांनी त्याला रिप्लाय दिला. ते म्हणाले की रोहित जर क्रिकेटपटू असेल तर मी जगातील सर्वात हॅन्डसम पुरुष आहे.
ब्रॉड आणि अँडरसनचे एक एक शटक खेळून काढून दाखवू दे त्याला. ते जाऊ दे स्टार्क, हेझलवुड आणि कमिन्स यांचे सगळे मिळून ३० चेंडू जर त्याने खेळून काढले तर मी माझी अर्धी मिशी काढून टाकतो. असा रिप्लाय काकांनी दिला आणि पैज लावली.
तिसऱ्या कसोटीदरम्यान रोहितसाठी मयंक अग्रवालला डच्चू देण्यात आला. यानंतर आजच्या दिवशी रोहितने २६ धावा केल्या. हेझलवूड, स्टार्क आणि कमिन्सचे ७७ चेंडू तो खेळला. यानंतर काकांनी आपला शब्द पाळला आणि चक्क आपली अर्धी मिशी काढली.
त्यांनी अर्धी मिशी काढलेला फोटोही सोशल मीडियावर सोडला आहे. यानंतर काकांचे खूप कौतुक होत आहे कारण त्यांनी दिलेला शब्द पाळला. हा प्रकार सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काढलो बघा pic.twitter.com/WUEx9RtfWc
— Ajay (@Ajay81592669) January 8, 2021