Share

सेक्स केल्यानंतर १० मिनीटातच गेली व्यक्तीची स्मरणशक्ती, तपासणी केल्यानंतर डॉक्टरही हैराण

आयर्लंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत (wife) शारिरीक संबंध ठेवल्यानंतर त्या पुरुषाची स्मरणशक्ती अचानकी गायब झाली आहे. पत्नीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर त्या व्यक्तीला स्मृतीभ्रंशाचा त्रास झाला आहे. तो व्यक्ती सर्व काही विसरला आहे. यामुळे पत्नीला मोठा धक्का बसला आहे. (Memories of a person passed away within 10 minutes after having physical relation with wife)

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवल्यानंतर १० मिनिटांनी एका व्यक्तीची स्मरणशक्ती गेली आहे. ती व्यक्ती गेल्या दोन दिवसातील सर्व गोष्टी विसरली होती. त्या व्यक्तीला अल्पकालीन मेमरी लॉस झाला होता. या आजाराला ‘ट्रान्झिट ग्लोबल इन्सनिया’ असे म्हणतात. एका अहवालात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

आयरिश मेडिकल जर्नलच्या रिपोर्टनुसार, सेक्स केल्यानंतर १० मिनिटांनी ६६ वर्षीय वृद्ध व्यक्ती सर्व काही विसरली आहे. त्या व्यक्तीला अचानक स्‍मृती कमी होण्याचा आजार झाला आहे. आयर्लंडमधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल लिमेरिकच्या न्यूरोलॉजी विभागाने यासंदर्भात एक अहवाल तयार केला आहे. सेक्समुळे स्मरणशक्ती कमी होते, अशी माहिती या अहवालातून देण्यात आली आहे.

सात वर्षांपूर्वी एका व्यक्तीसोबत असाच प्रकार घडला होता. तो व्यक्ती स्मृतीभ्रंश झाल्याची तक्रार घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला होता. यावेळी त्या व्यक्तीचा अभ्यास करण्यात आला. ट्रान्सिएंट अॅम्नेशिया असोसिएटेड विथ प्रोलिफरेशन रिस्ट्रिक्शन या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात व्यक्तीची दोन दिवसांची स्मरणशक्ती कमी झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

हा आजार ५० ते ७० वयोगटांमधील लोकांना होण्याची शक्यता असते. या आजारामुळे व्यक्ती काही दिवसांपूर्वीच्या घटना विसरून जातो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्सिएंट ग्लोबल अॅम्नेशियाचा संबंध मायग्रेन, शारीरिक व्यायाम, गरम-थंड पाणी, भावनिक ताण, वेदना आणि लैंगिक संभोग यांच्याशी आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कटप्पाचा रोल करत आहेत”, आमदार रवी राणांचा खोचक टोला
जॉस द बॉस’ला IPL मध्ये मिळाली तब्बल ‘एवढी’ बक्षिसे, वाचा कोणत्या खेळाडूला किती पैसै मिळाले?
सिद्धू मुसेवालाची हत्या कोणी केली? काय होते नेमके कारण? पोलिसांनी शोधलं कॅंनडा कनेक्शन

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय इतर

Join WhatsApp

Join Now