तुमचा व्हायरस वुहानवाला, तर आमचा सायरस पुनावाला

पुणे | नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार यावरून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी मोदींवर भन्नाट मिम्स बनवले आहेत. सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांच्यावरदेखील काहींनी मिम्स बनवले आहेत. “तुमचा व्हायरस वुहानवाला, तर आमचा सायरस पुनावाला” अशा प्रकारचे भन्नाट मिम्स त्यांच्यावर बनवले आहेत.

एकाने लिहिले आहे की, भाजपने सगळ्यांना कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे कोरोना लसीची पाहणी करण्यासाठी मोदी पुण्यात येणार आहेत. आता सगळ्या राज्यातील लोक पुण्यात येतील मोदींच्या मागेमागे. तर काहींनी लिहिले आहे पुणेकरांनो उठा, आज तुमचे मनोरंजन होणार आहे.

एकाने लिहिले आहे पुणेकरांनो…उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली.असे अनेक मिम्स सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भरपूर तयारी केली आहे. पंतप्रधान मोदी हे एक तासाच्या भेटीत कोरोना लस च्या निर्मिती बाबतचा आढावा घेणार आहे.

मोदी दुपारी ४ च्या दरम्यान सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सिरम इन्स्टिट्यूटची पाहणी केली आहे. कोरोना लस सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी १०० देशांचे राजदूतही सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.

मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे तारखेत बदल करण्यात आला आहे. राजदूत हे चार डिसेंबरला येणार आहेत. दरम्यान, मोदी आज काय निर्णय घेतील? तसेच कोरोना लसीबाबत आनंदाची बातमी मिळेल का? यावर सगळ्या पुणेकरांचे आणि देशातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.