नुकतंच ताजमहलाबाबत लखनऊ उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या माध्यमातून ताजमहलाचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. ताजमहलातील २२ बंद खोल्यांमध्ये हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आहेत, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. भाजप नेते रजनीश यांनी ही याचिका दाखल केली आहे.(Mehbooba Mufti’s direct challenge to BJP)
या मुद्द्यावरून सध्या उत्तर प्रदेशात वाद निर्माण झाला आहे. या वादात आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती(Mehbooba Mufti) यांनी देखील उडी घेतली आहे. ताजमहालाचे तेजोमहाल नामकरण करण्यावरून जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी भाजप सरकार आणि हिंदू संघटनांना इशारा दिला आहे.
“तुमच्यात हिम्मत असेल तर ताजमहाल आणि लाल किल्ल्याला मंदिर बनवून दाखवा. मग बघुयात जगातले किती पर्यटक ते बघायला येतील”, अशा शब्दात मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपाला आव्हान दिले आहे. यावेळी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, “लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच हा वाद निर्माण केला जात आहे. देशातील पैसा लुटून परदेशात पळून गेलेल्या लोकांना पकडण्याऐवजी मुघलांनी बांधलेल्या प्रत्येक जागेला ते विरोध करत आहेत. लोकांची दिशाभूल केली जात आहे”, असा आरोप माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, “भाजप सरकारला महागाई नियंत्रणात आणता येत नाही. देशामधील मालमत्ता विकण्याचा प्रकार सध्या चालू आहे. देशात महागाईसोबत बेरोजगारी सातत्याने वाढत आहे. आज आपला देश पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्या मागे गेला आहे”, असे देखील मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले आहे.
“तुमच्यात हिम्मत असेल तर ताजमहाल आणि लाल किल्ल्याला मंदिर बनवून दाखवा. मग बघुयात जगातले किती पर्यटक ते बघायला येतील. या लोकांना मुघल काळातील सर्व गोष्टी नष्ट करायच्या आहेत”, असे देखील जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत. यावर अद्याप भाजप पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या :-
राज ठाकरेंसाठी फडणवीस मैदानात..; युपीतील भाजप खासदारांना केले ‘हे’ आवाहन
एकाचा विरोध तर एकाचा पाठिंबा! राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी भाजप खासदाराची जय्यत तयारी
राज ठाकरेंच्या पत्राला आदित्य ठाकरेंनी शिवसेना स्टाईलने दिले उत्तर, म्हणाले, संपलेल्या पक्षावर…