राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अडचणीत; बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरूणीचा आत्मह.त्येचा इशारा

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. शेख यांनी एका तरुणीला नोकरीच्या आमिषाने १४ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भेटण्यासाठी बोलावले आणि त्यानंतर तिला गाडीत बसवून निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती.

त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आता याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी राज्य सरकार आणि गृहखात्याला इशारा दिला आहे. शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन सव्वा महिना उलटला तरीदेखील अजून त्याला अटक करण्यात आलेली नाही. सर्वसामान्य लोक आणि सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी, मंत्र्यांसाठी कायदा समान नाही का? असा सवाल देसाई यांनी उपस्थित आहे.

त्या पुण्यात बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मुलीने काही बरे वाईट केलं तर त्याला मेहबूब शेख जबाबदार असतील, असेही तृप्ती देसाई म्हणाल्या.

यावेळी पीडित तरुणीने देखील आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना पीडित तरुणीने ५ दिवसांच्या आत मला न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करणार असल्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. यामुळे शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या
“सेलिब्रिटींवर दबाव आणून ट्विट करण्यास भाग पाडल्याचे भाजपाचे षडयंत्र उघड”
शेतकऱ्यांनी वीजबिले भरलीच पाहिजेत; अजित पवारांनी स्पष्ट शब्दात खडसावले
रिहानाचा टॉपलेस फोटो आणि गळ्यातील पेंडेंट पाहून राम कदम संतापले, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.