“नाव वाघ असलं म्हणून मांजर वाघ होत नाही अन् अशा ५६ चित्रा वाघ आल्या तरी मी त्यांना घाबरत नाही”

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबूब शेख आणि भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यात सध्या शाब्दिक वाद सुरु आहे. चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्यावर टीका केली होती. आता त्याच टीकेला मेहबूब शेख यांनी उत्तर दिले आहे.

असल्या ५६ चित्र वाघ आल्या तरी मला फरक पडत नाही आणि असल्या मांजरीला आणि बोक्यांना मी घाबरत नाही, असा टोला मेहबूब शेख यांनी चित्र वाघ यांनी लगावला आहे. त्यामुळे चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

चित्रा वाघ यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे जेव्हा मेहबूब शेख जेव्हा पारनेर दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी चित्रा वाघ यांना लाचखोर नवऱ्याची बायको म्हटले होते. तसेच आधी नवऱ्याला नितीमत्ता शिकवा, असा सल्ला दिला होता. त्यानंतरच या शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली होती.

तुम्ही काहीही म्हटलं तरी तुमची ओळख लाचखोर नवऱ्याची बायको हीच आहे. लाचखोर नवऱ्याच्या बायकोचं नाव वाघ असल्यामुळे मांजर वाघ होत नाही. आपल्या नवऱ्याने कशात आणि कोणत्या प्रसंगात लाच घेतली यावर अधिक स्पष्टपणे तुम्ही बोला, असे मेहबूब शेख यांनी म्हटले आहे.

तसेच मेलेल्या माणसांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी किशोर वाघ यांनी लाच घेतली, हे तुम्ही राज्यातील जनतेला सांगा. त्या स्वत:ला वाघ म्हणवतात. पण मांजर कधी वाघ होत नसते. आपल्या खोटारड्या वाघासोबत माझा मुलगा रोज खेळत असतो. चित्रा वाघ यांची बरीच प्रकरण मला माहित आहे, ती मी बाहेर काढणार आहे, असा इशाराही मेहबूब शेख यांनी म्हटले आहे.

हैद्राबाद बलात्कार प्रकरण; सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार यांना अटक होण्याची शक्यता..
सध्या समजुतदार मुस्लिम नेत्यांनी धर्मांध शक्तींविरोधात एकत्र येण्याची गरज- मोहन भागवत
सापाची शेपूट पाहून अंदाजा लावू नका; पहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.