दिवंगत अभिनेता चिरंजीवीच्या मुलाला पाहिलेत का?, व्हिडीओ पाहून चाहते झाले भावुक

मुंबई | गेल्या वर्षी करोना काळात चिरंजीवी सर्जाच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण कन्नड सिनेसृष्टी हादरून गेली होती. वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी चिरंजीवीने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूवेळी पत्नी मेघना राज सर्जा तीन महिन्यांची गरोदर होती. चिरंजीवी सर्जा यांच्या निधनाने देशभर दुःखाचं वातावरण पसरले होते.

ऑक्टोबर महिन्यात मेघनाने बाळाला जन्म दिला. आता मेघनाने तिच्या बाळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेघनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ज्युनिअर चिरंजीवीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ आता पर्यंत ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेघनाने आधीच चाहत्यांना सांगितलं होते की, १३ जानेवारीच्या रात्री १२ वाजता अभिनेत्रीने आपल्या मुलाची पहिली झलक संपूर्ण जगाला दाखवणार आहे.

चिरंजीवी सर्जा याची पत्नी मेघना राज सर्जा हिने चाहत्यांना दिलेले वचन पूर्ण केले. यासोबतच व्हिडिओच्या शेवटी आईच्या कुशीत आहे आणि बाजूला असलेल्या वडिलांच्या फोटोकडे पाहत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, ‘आमच्या छोट्या राजकुमाराशी ओळख करुन देते’ या आशयाचे कॅप्शन मेघनाने दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
काय सांगता! पंतप्रधान मोदींचा फोटो आणि भगवद्गीतेची प्रत अंतराळात पाठवणार
अरुण गवळी होणार आजोबा; लेकीने फोटो शेअर करत दिली गोड बातमी
स्वप्नाली पाटीलने आस्तादसाठी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.