चार तास बैठक मात्र तोडगा नाही, आव्हाड म्हणाले पवार आणि एसटी कामगारांचे जिव्हाळ्याचे नातं..

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. हे कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम असल्याने एसटी संपाबाबत अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही, राज्य सरकारने यावर एकत्रितपणे तोडगा काढण्याचे आवाहनही केले आहे. त्यामुळे आतातरी एसटी संपावर नेमका काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पुढाकार घेऊन परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत चार तास चर्चा केली. मात्र यातून देखील काही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर काहींनी शरद पवारांच्या बैठकीबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच टीका देखील केली.

यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, गेल्या 40 वर्षांपासून एसटी कामगारांच्या समस्या आणि एसटी कामगारांशी शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या समवेत बैठक झाल्यास त्यात वावगे काय?, असे आव्हाड म्हणाले.

हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यामुळे यावर कधी तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबई आझाद मैदानावर याबाबत आंदोलन सुरू आहे. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून एसटी ठप्प झाली आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या असल्या, तरी विलीनीकरणाबाबत अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. कोर्टात देखील हे प्रकरण गेले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे.

विरोधी पक्ष याबाबत आक्रमक झाले असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर हे आझाद मैदानात तळ ठोकून आहेत. येथेच ते राहत आहेत. त्यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.