ठरलं! लोकसभेला ४०० जागा कशा जिंकायच्या, प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्यात बैठक

मुंबई । देशात सध्या भाजप सरकार सत्तेवर आहे. यामुळे हे सरकार घालवण्यासाठी विरोधीपक्ष चांगलेच कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल चार तास चर्चा केली. ही बैठक अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.

ही अत्यंत सिक्रेट मिटींग होती, या बैठकीत भाजपला पर्याय म्हणून तिसरी आघाडी स्थापन करण्यासह भाजपला मात देण्यासाठीच्या व्यूहरचनेवरही चर्चा झाली. यामुळे २०२४ ला सत्ताबदल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बैठकीत भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र कसे आणता येईल? भाजपविरोधात उभे ठाकण्याचा समान धागा काय असू शकतो, याचे सादरीकरणच प्रशांत किशोर यांनी पवारांना दिल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता २०२४ ची लढत भाजपसाठी हवी तेवढी सोपी नसणार आहे.

देशपातळीवर भाजपविरोधात विरोधकांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युला काय असेल, तसे न घडल्यास राज्य पातळीवर विरोधकांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युला काय असावा याची माहितीही त्यांनी पवारांना दिली आहे. मुंबईत ही बैठक पार पडली.

या महत्त्वाच्या भेटीत प्रशांत किशोर यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत ४०० जागांवर मात देता येऊ शकत असल्याचे सांगितले. त्या जागा कोणत्या, कोणत्या राज्यात किती जागा आहेत, त्या राज्यात कोणते प्रादेशिक पक्ष मोठी भूमिका बजावू शकतात, याची आकडेवारीच प्रशांत किशोर यांनी पवारांना दिली आहे.

काँग्रेस एकटा भाजपला हरवू शकत नाही. यामुळे प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन चालल्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी या बैठकीत पवारांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. देश पातळीवर आणि राज्य पातळीवर कसे गणित असायला हवे, असे देखील या बैठकीत ठरले आहे.

ताज्या बातम्या

…म्हणून झाले प्रियांका चोप्रा व शाहीद कपूरचे ब्रेकअप; अखेर खरे कारण आले समोर

टाटांची ‘ही’ कंपनी बनली देशातील सर्वात मोठी कंपनी, कोरोना काळात केला ‘एवढ्या’ कोटींचा फायदा

लायसन्स काढणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता RTO टेस्ट न देताच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; जाणून घ्या कसं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.