शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतने कॅमेऱ्यासमोरच धडाधड बदलले कपडे; पहा व्हिडिओ..

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपुर याची पत्नी मीरा राजपूत ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मीरा नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असते. आता असाच एक मीराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मीरा या व्हिडिओमध्ये वेगवेगळे आऊटफिट्स घालताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शाहिद कपुर सुद्धा स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकलेला नाहीये.

मीराचा हा व्हिडिओ खुप गंमतीदार आहे. या व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यासमोर मीरा एक एक आऊटफिट ट्राय करत आहे. तसेच आऊटफिट चेंज करण्यासोबतच ती आऊटफिटला साजेशी ज्वेलरी सुद्धा घालताना दिसून येत आहे.

मीराच्या या व्हिडिओवर शाहिद कपुरने सुद्धा कमेंट केली आहे. मीरा मोईरा है अशी कमेंट शाहिद कपुरने केली आहे. मीराच्या व्हिडिओला सोशल मीडियावर खुप पसंत केले जात आहे.

मीरा नेहमीच आपल्या नवनवीन आऊटफिट्सवर फोटो, व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपुर्वी मीराने स्विमसुटमधला फोटो शेअर केला होता, तो पण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

दरम्यान, मीरा राजपूत आता पुर्णपणे एक लाईफ स्टाईल ब्लॉगर बनली आहे. कारण ती नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन आरोग्या विषयक टिप्स, फिटनेस सिक्रेट्स, ग्रुमिंग टिप्स देत असते.

महत्वाच्या बातम्या-

अभिषेक बच्चनने सांगितले खरे कारण, ‘या’कारणामुळे त्याने कधी ऐश्वर्यासोबत किसिंग सीन नाही दिला
कोरोनाला ९०व्या वर्षी दोनदा हरवणाऱ्या या पैलवणाची कहाणी माहितेय का.? जाणून घ्या
राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू, आता कुठेही फिरता येणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.