नकली आयकार्ड बनवून अभिनेत्रीने घेतली कोरोना लस; धक्कादायक माहिती आली समोर

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. १ मेपासून तर १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना कोरोनाची लस दिली जात आहे.

अशात सध्या राज्यात पुरेसा लससाठा नसल्यामुळे १८ वर्षांवरील नागरीकांचे कोरोना लसीकरण बंद करण्यात आले आहे. असे असताना एख अनोखे प्रकरण समोर आले आहे. एका अभिनेत्रीने बनावट आयकार्ड बनवून कोरोनाची लस घेतल्याचा प्रकार घडला आहे.

ठाणे महापालिकेच्या प्लाझा कोरोना रुग्णालयात मीरा चोप्रा नावाच्या अभिनेत्रीने कोरोनाची लस घेतली आहे. तिने सोशल मीडियावर लसीकरणाचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

३६ वर्षीय मीरा चोप्राने सुपरवाझरचे ओळखपत्र दाखवून सरकारी कर्मचाऱ्यांच्या लस साठ्यामधून कोरोना लस घेतली आहे. विशेष म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंत्राटदार कंपनीनेच मीराला ओळखपत्र दिल्याचे समोर आले आहे.

पुरेशा लसी नसल्यामुळे राज्यभरात १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचे लसीकरण बंद करण्यात आले. तसेच कोविन ऍपमध्ये लसीकरणाचे बुकींगही केले जात नाही. अशातच हे प्रकरण समोर आल्याने कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

लस घेतल्यानंतर मीराने लसीकरणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे अनेकांनी मीराला वय कमी असताना कोरोनाची लस कशी मिळाली? असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा एका व्यक्तीने मीराच्या सुपरवायझर ओळखपत्राचा फोटो टाकला. त्यानंतर हा सर्वप्रकार उघडकीस आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“अजितदादा जरा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल”
विनोदी अभिनेता भुषण कडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, पत्नीचे कोरोनामुळे निधन
अमिताभसोबत सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करणारे गोगा कपूर बॉलीवूडमधून गायब का झाले? वेगळीच माहिती आली समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.