Raj And Uddhav Thackeray On Meenatai Statue : दादर (Dadar) येथील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) स्वर्गीय मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) यांच्या पुतळ्यावर (Statue) रात्री कोणीतरी लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचे 1995 मध्ये निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ शिवाजी पार्क परिसरात अर्धकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) घटनास्थळी दाखल झाले. राज ठाकरे यांनी पुतळ्याच्या परिसराचा संपूर्ण आढावा घेत पोलिसांकडून अद्याप केलेल्या कारवाईची माहिती घेतली. यावेळी राज ठाकरे यांचे सहाय्यक व मनसे सचिव सचिन मोर (Sachin More) देखील घटनास्थळी उपस्थित होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ही शाखा प्रमुखांच्या बैठकीपूर्वी घटनास्थळी येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सकाळी ६.१० नंतर कोणीतरी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित शिवसैनिकांनी तातडीने आजूबाजूची साफसफाई केली. स्थानिक आमदार महेश सावंत (Mahesh Sawant) यांनी सांगितले की, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना समजली आणि तत्काळ शिवसैनिक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना सहा ते साडेसह दरम्यान घडली असावी. आरोपीबाबत तपास सुरू असून, दुपारपर्यंत त्याची माहिती समोर येणार आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पुतळ्याच्या सुरक्षा व निगराणीवर लक्ष ठेवले जात आहे.