..म्हणून नर्गिस यांनी मीना कुमारी ह्यांचे पार्थिव शरीर बघून रडण्याऐवजी त्यांना दिल्या होत्या मृत्यूच्या शुभेच्छा

आजचा किस्सा आहे अभिनेत्री मीना कुमारी आणि नर्गिसचा. वयाच्या ३८ व्या वर्षी मीना कुमारीचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूमूळे इंडस्ट्रीतील सर्वांना धक्का बसला होता. तर दुसरीकडे अभिनेत्री नर्गिस यांनी मीनाला मृत्यूबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या.

नर्गिस मीनाला अशा का बोलल्या असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण हे खरे आहे मीना कुमारीच्या मृत्यूनंतर नर्गिसने त्यांच्या मृत्यूच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या या गोष्टीमूळे सर्वांनाच खुप मोठा धक्का बसला होता. जाणून घेऊया नक्की काय आहे हा किस्सा.

मीना कुमारी यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या अभिनयासोबतच सौंदर्यामूळे देखील ओळखले जात होते. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक यशस्वी चित्रपट दिले आणि स्वत ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्या त्यांच्या प्रोफेशन आयूष्यात जेवढ्या सुखी होत्या. तेवढ्या त्या वैयक्तिक आयूष्यात दुखी होत्या.

वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी ३४ वर्षांच्या करिअरमध्ये ९२ चित्रपटांमध्ये काम केले. वयाच्या ३८ व्या वर्षी त्या जग सोडून गेल्या.

१९७२ मध्ये त्यांचा हिट चित्रपट पाकिजा रिलीज झाला होत्या. त्यानंतर तीन आठवड्यांनी त्यांचे निधन झाले. दोन दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर ३१ मार्च १९७२ ला त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ३८ वर्ष होते. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीला खुप मोठा धक्का बसला होता.

मीना कुमारी यांच्या अंतिम यात्रेत सगळी फिल्म इंडस्ट्री आली होती. अभिनेत्री नर्गिस यांनी मीना कुमारीला निरोप देताना त्यांना मृत्यूच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या, ‘मीना कुमारी तुला मृत्यूच्या खुप शुभेच्छा. मी हे या अगोदर कोणालाही बोलले नव्हते. पण तुला बोलते. हे जग तुमच्यासारख्या लोकांसाठी बनलेलं नाही’. हे ऐकून सर्वांना धक्का बसला होता.

नर्गिस आणि मीना कुमारी खुप चांगल्या मैत्रीणी होत्या. सुनिल दत्तमूळे त्यांची पहीली भेट झाली होती. त्यानंतर दोघींमध्ये खुप चांगली मैत्री झाली होती. दोघे एकमेकींसोबत सगळ्या गोष्टी शेअर करत होत्या. त्यामूळे नर्गिसला मीना कुमारीच्या वैयक्ति आयूष्याबद्दल सगळे काही माहीती होते.

मीना कुमारीने दिग्दर्शक कमाल अरोहीसोबत लग्न केले होत. पण त्या दोघांच्या नात्यात खुप जास्त तणाव होता. दोघांची भांडण होत होती. त्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये होत्या. त्यासोबत मीना कुमारी त्यांच्या कामामध्ये खुप व्यस्त होत्या. त्यामूळे देखील त्या तणावात होत्या.

असे बोलले जाते की, कमाल अमरोहीच्या सेक्रेटरीने मीना कुमारी हात उचलला होता. त्यानंतर दोघा नवरा बायकोंमध्ये खुप भांडण झाली होती. शेवटी दोघे वेगळी झाली. घटस्फोटानंतर मीना कुमारी खुप जास्त दारु पित होत्या. त्यांचे हे दुख नर्गिसला बघवत नव्हते. म्हणून त्यांनी मृत्यूनंतर मीना कुमारी यांनी मृत्यूच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

अरेरे! ही तर वारं आल्यावर उडून जाईल; टेलिव्हिजनवरील नागिन झिरो फिगरमूळे झाली ट्रोल

अक्षय कुमारच्या प्रेमात पागल झालेल्या शिल्पा शेट्टीने उचलले होते ‘हे’ टोकाचे पाऊल

परत एकदा नेपोटिजमच्या मदतीला धावून आला सलमान; सलमानमूळे आलियाला मिळाली गंगूबाईची भुमिका

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.