५०० रूपयाचे रेमडेसिवीर ७० हजारांना विकणाऱ्या मेडीकल चालकांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलं आहे. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना लस, बेड आॉक्सिजन यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. देशात कोरोना रुग्णांचा मृत्यू अत्यंत धक्कादायक तऱ्हेने होत असल्याचं समोर येत आहे.

आपल्या रुग्णाला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक धावपळ करत असतात. रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक मिळेल त्या किंमतीत रेमडेसिवीर खरेदी करत आहे. यामुळे या रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याच्या घटना घडत आहेत.

राजधानी दिल्लीतही कोरोनाची गंभीर परिस्थीती आहे. अशातच रेमडेसिवीरचा साठा करून त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे  आरोपींमधील दोघेजण मेडीकल चालवतात आणि एक जण ज्वेलरीचं दुकान चालवतो. आरोपी १ रेमडेसिवीर तब्बल ७०,००० रुपयांना विकत होते.

दिल्ली पोलिसांना २५ एप्रिल रोजी माहिती मिळाली होती की चढ्या दरात रेमडेसिवीरची विक्री करण्यासाठी काहीजण येणार आहेत. पोलिसांनी सापळा रचून एका होंडा सिटी कारमधून रेमडेसिवीर जप्त केले आणि आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी आरोपी अनुप जैन, लिखित गुप्ता आणि आकाश वर्मा यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यांच्या रॅकेटमध्ये आणखी कुणी सहभागी आहे का? याचाही तपास करण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे.

दरम्यान देशात गेल्या २४ तासात ३ लाख ५२ हजार ९९१ रुग्णांची नोंद झाल आहे. तर २,८१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील आजवरची कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ वर पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या-
ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची खरी गरज कधी लागते.? एम्सचे डॉक्टर म्हणतात..
सरकार मृतांचा आकडा लपवतय, वास्तव परिस्थीती भयानक; निर्मला सीतारामनच्या पतीची मोदींवर टीका
कोरोना झाल्यापासून ते बरे होण्यापर्यंत घरच्या घरी कसे घ्यावेत उपचार, जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.