Ajit Pawar : आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी आपल्या वेगवान कार्यशैलीची पुन्हा एकदा झलक दाखवत परशूराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन* वेळेच्या आधीच उरकलं. हे उद्घाटन *सकाळी 6:30 वाजता* ठरवण्यात आलं होतं, मात्र अजित पवारांनी *6:20 वाजताच रिबीन कापून* कार्यक्रम पार पाडला.
खासदार मेधा कुलकर्णी(medha kulkarni) नियोजित वेळेपेक्षा काही मिनिटे आधीच कार्यक्रमस्थळी पोहोचल्या, पण तोपर्यंत उद्घाटन आटोपलं होतं. ही बाब लक्षात येताच त्यांनी मोबाईलवर वेळ दाखवत अजित पवारांना थेट सवाल केला – “दादा, आत्ताशी 6:24 वाजलेत!”* यावर अजित पवारांनी उत्तर दिलं, “मला काय माहिती तुम्ही येणार आहात.” यावर मेधा कुलकर्णींनीही नाराजी व्यक्त करत म्हटलं, “मी येणार नाही? हे तर परशूराम आर्थिक महामंडळ आहे, अशा ऐतिहासिक गोष्टीत हे कसं चालेल?”
मेधा कुलकर्णींची विनंती
माध्यमांशी बोलताना मेधा कुलकर्णी(medha kulkarni) म्हणाल्या, “मी मुद्दा वाढवणार नव्हते, पण वेळेआधी उद्घाटन झालं हे खटकण्यासारखं आहे. माझी विनंती एवढीच की दादांनी कोणतीही वेळ ठरवली, तरी ती वेळ पाळावी. बस किंवा फ्लाइट आधी निघून गेली, तर वाईट वाटतंच.”
त्यांनी पुढे सांगितलं की, “*पुण्यात मी एकमेव ब्राह्मण खासदार आहे*, आणि या महामंडळासाठी निश्चितपणे काम करेन. आम्ही सगळे जण वेळेवर हजर होणारच होतो.”
अजित पवारांनी(Ajit Pawar घेतली सुधारणा
मेधा कुलकर्णींच्या नाराजीनंतर *अजित पवारांनी त्वरित परिस्थितीचा अंदाज घेत पुन्हा एकदा उद्घाटनाची औपचारिकता पार पाडली*. दुसऱ्यांदा रिबीन कापून फोटोही काढले गेले, आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला.
सकाळच्या वेळापत्रकात नेहमीच कार्यरत असणारे अजित पवार यावेळीही त्यांच्या वेगाने पुढे गेले, पण यामुळे एक छोटेसे राजकीय गोंधळ निर्माण झाला. मेधा कुलकर्णींच्या प्रतिक्रिया आणि अजित पवारांचा(Ajit Pawar) प्रतिसाद दोघांच्या राजकीय संयमाचं उदाहरण ठरलं.
medhatai-spoke-clearly-on-ajit-pawars-inauguration-rush