अभिमानास्पद! भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव

टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. आज भारताच्या महिला बॉक्सर लवलीना बोर्गोहेनने कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. आज सेमीफायलच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन टर्कीची बॉक्सर सुरमेनेलीला नमवून आपल्या पदकाचा रंग बदल्याण्याची संधी लवलीनाकडे होती. यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अटीतटीच्या सामन्यात सुरमेनेलीने लवलीनाला ५-० ने नमवत पुढची फेरी गाठली. असे असले तरी तिचे कौतुक होत आहे. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. टर्कीच्या सुरमेनेलीने चपळ खेळ दाखवत सुरुवातीपासून सामन्यावर दबदबा कायम ठेवला.

अचूक टार्गेट गाठत तिने अधिक गुण मिळवले. त्यामुळे तिन्ही राउंडमध्ये तिने सामना ५-० ने आपल्या नावे केला. यामुळे तिचा विजय झाला. मात्र भारताला ऑलिम्पिक खेळात पदक मिळवून देणारी लवलीना तिसरी बॉक्सर असून दुसरी महिला बॉक्सर आहे.

२००८ साली बीजिंग ओलम्पिकमध्ये विजेंदर सिंहने कांस्य पदक जिंकले होते. तसेच २०१२ मध्ये लंडन ओलम्पिकमध्ये मेरी कोमने कांस्य पदक जिंकले होते. लवलीनाने पहिल्यांदाच ऑलम्पिक खेळताना पदक जिंकले आहे. यामुळे हे सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. आता इतर खेळाडूंकडून देखील सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत. आज देखील इतर सामने होणार आहेत. असे असले तरी गोल्ड अजुनही भारताने जिंकले नाही. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राची अप्सरा मालदीवमध्ये! समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक; फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’ मालिकेत करणार काम

…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली सेवानिवृत्त झालेल्या जवानाची मिरवणूक, पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.