बंगळूरमध्ये एका एमबीए पदवी घेतलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वाहन चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीने चार वर्षात तब्बल १४ वाहने(Car) चोरली आहेत. या आरोपीने बंगळूर पोलिसांना एक ओपन चॅलेंज दिलं होतं. आपल्याला पकडून दाखवावं, असं आव्हान या आरोपीने पोलिसांना दिले होते.(mba degree person become thief and give open challenge to police )
या आरोपीने बंगळूर पोलिसांना व्हाट्सअप मेसेज करत हे चॅलेंज दिलं होतं. अखेर पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या आरोपीकडून एका टोयोटा कार आणि एक ऑडी कार जप्त केली आहे. या आरोपीचे नाव सत्येंद्र सिंह शेखावत असं आहे. त्याचा मुलगा सध्या वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे.
आरोपी सत्येंद्र सिंह शेखावत मूळचा राजस्थानमधील जयपूरचा रहिवाशी आहे. तो सध्या बंगळूर शहरात वास्तव्यास आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांपासून आरोपी सत्येंद्र सिंह शेखावत बंगळूर शहरात गाड्यांची चोरी करायचा. त्याने आतापर्यंत १४ गाड्यांची चोरी केली आहे. पोलीस खूप दिवसांपासून शोधात होते. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आरोपी सत्येंद्र कार आणि एसयूव्हीच्या डुप्लिकेट चाव्या बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या डुप्लिकेट चाव्यांचा वापर करत तो वाहनांची चोरी करायचा. २००३ मध्ये पहिल्यांदा आरोपी सत्येंद्र सिंह शेखावत विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याने आतापर्यंत देशातील विविध राज्यांमध्ये वाहनांची चोरी केली आहे.
त्याच्याविरोधात कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात चोरीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्याच्यावर ४० पेक्षा अधिक वाहनांच्या चोरीचा आरोप आहे. त्याला अनेकवेळा अटक देखील करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये त्याला तुरुंगवासही भोगावा लागला आहे. पण तुरुंगातून सुटल्यानंतर तो पुन्हा वाहनांची चोरी करू लागला.
आरोपी सत्येंद्रने पोलिसांना आव्हान देखील दिलं होतं. त्याने पोलिसांना यासंदर्भातील व्हाट्सअप मेसेज केला होता. त्या मेसेजमध्ये त्याने लिहिले होते की, “तुम्हाला मला पकडता येत असेल तर पकडून दाखवा”, असे खुलं आव्हान आरोपी सत्येंद्रने पोलिसांना दिलं होतं. पोलिसांनी ते आव्हान स्विकारत आरोपीला बंगळूरमधून अटक केली.
महत्वाच्या बातम्या :-
लग्नाआधीच मुलाबाळांची प्लॅनिंग करतेय ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “मला कमीत कमीत २५ मुलं तरी हवी”
आयुष्यच बेरंग झालं; रंगपंचमीच्या दिवशी आईच्या आठवणीत भावूक झाले मिलिंद गवळी
लव्हबर्डस विकी-कतरिनाने साजरी केली लग्नानंतरची पहिली रंगपंचमी; पहा सुंदर फोटो