‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिका खऱ्या आयुष्यात आहे एकदम माॅडर्न

सध्या महाष्ट्रात अनेक मालिका खुप जास्त प्रसिद्ध आहेत. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांनी घराघरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून घरा घरात पोहोचलेली ३०० करोडची मालकीन राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दातेबद्दल.

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने टेलिव्हिजनवर चार वर्षे पुर्ण केले आहेत. या चार वर्षात मालिकेत अनेक बदल झाले. पण मालिकेतील कलाकारांमध्ये काही बदल झाला नाही. गुरू, शनाय आणि राधिका या दिघांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

या मालिकेत राधिकाची भुमिका निभावणाऱ्या अनिता दाते या अभिनेत्रीची एक वेगळाच चाहता वर्ग आहे. अनिताचा जन्म नाशिकमध्ये झाला होता. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिने मोठी झाल्यानंतर अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला होता.

तिचे हे स्वप्न तिने सत्यात उतरवले. आज घराघरात पोहोचलेल्या अनिताने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. माझ्या नवऱ्याची बायको ही तिची पहिली मालिका नाही. तिने या अगोदर अनेक मालिका केल्या आहेत.

अनिताने पुण्यातील ललित केंद्रातून अभिनयाचे शिक्षण घेतले. कॉलेमध्ये असताना अनिताने अनेक नाटकांमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर तिने रंगभूमीवर अनेक व्यवसायिक नाटके केली आणि ती अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली.

२००८ मध्ये अनिताने खऱ्या अर्थाने तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. तिच्या सिनेमांच्या यादीत जोगवा, पोपट, आजोबा, गंध, सीमा, अडगुल मडगूळ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

तिचे सर्वाधिक गाजलेले चित्रपट म्हणजे तुंबाड आणि कॉफी आणि बरचं काही. या चित्रपटांनी अनिताला खास ओळख मिळवून दिली. तुंबाड चित्रपटातील तिच्या भुमिकेने तिला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली.

‘दार उघडले गडे’ या मालिकेद्वारे तिने छोट्या पडद्यावर प्रवेश केला. त्यानंतर अग्निहोत्र, मंथन, अनामिका आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकांमध्ये काम केले. २०१३ मध्ये तिने राणी मुखर्जीच्या ‘आय्या’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला.

आय्या चित्रपटात अनिताला ओळखणे खुपच कठीण आहे. तिचा लुक खुप वेगळा आहे. पण तिच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. चित्रपटांपेक्षा जास्त अनिताला मालिकेमधून प्रसिद्ध मिळाली. म्हणून तिच्यासाठी मालिका खुप खास आहेत.

माझ्या नावऱ्याची बायको मालिकेने तिला खरे यश मिळवून दिले. अनिताला आज सगळीकडे ओळख आहे. मालिकेत सौमित्रसोबत लग्न करणारी राधिका खऱ्या आयुष्यात विवाहित आहे. तिने तिच्या कॉलेजच्या प्रियकरासोबत लग्न केले आहे.

अनिताने चिन्मय केळकरसोबत लग्न केले आहे. अनिता आणि चिन्मयची भेट कॉलेजमध्ये असताना झाली होती. त्यावेळी अनिताला लग्न करायचे नव्हते. म्हणून ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली. त्यानंतर काही वर्षांनी या दोघांनी लग्न केले.

छोट्या पडद्यावर काम करून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अनिताला तिच्या तुंबाड चित्रपटासाठी खुप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांना हा चित्रपट आणि या अनिताने निभावलेली भुमिका खुप जास्त आवडली.

२०१६ मध्ये अनिताला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेला चार वर्षे झाली. तरीही या मालिकेची प्रसिद्धी कमी झाली नाही. आजही लोक आवडीने ही मालिका बघतात.

हे ही वाचा –

तुरूंगातून बाहेर पडताच रिया चक्रवर्तीने घेतला बदला; तिच्यावर आरोप करणाऱ्या अंकीता लोखंडेंचा पुढचा नंबर असणार का?

अभिनेता धर्मेंद्रला हिंदू धर्म सोडून मुसलमान व्हावे लागले; यामागे आहे ‘हे’ धक्कादायक कारण

संजय दत्तला ‘त्या’ अवस्थेत बघून श्रीदेवीने त्याला धक्के मारून सेटवरुन हाकलून दिले होते

फेमस काॅमेडीयन राजू श्रीवास्तवला काम मिळणेही बंद झाले यामागे आहे हे धक्कादायक कारण

रिकाम्या पोटी लसून खाल्ला तर ‘ह्या’ गंभीर आजारांपासून होईल कायमची सुटका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.