मानलं भावा! रेल्वेकडून मिळालेल्या ५० हजारांमधील अर्धी रक्कम मयुर देणार त्या अंध मातेला

बदलापुर | वांगणी रेल्वे स्टेशनवर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावत जावून एका चिमुकल्याचा जीव  पाँईंटमन मयुर शेळकेने वाचवला होता. धाडस करत भरधाव वेगात असलेल्या रेल्वेसमोर जाऊन ६ वर्षाच्या चिमुकल्याचा जीव वाचवल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

राजकीय नेत्यांनी, सोशल मिडिया युजर्सनी मयुरचे कौतूक केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत मयुरचे तोंडभरून कौतूक केले होते. ज्या मुलाला मयुरने वाचवले होते त्या अंध मातेनेही मयुरला पुरस्कार देऊन सन्मान करा. त्याच्यामुळेच माझा आधार जीवंत राहिला असं म्हटलं होतं.

मयुरच्या धाडसाचे राज्यात नाही तर संपुर्ण देशभरात कौतूक होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फोन करून तुमचे कौतूक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. कल्पनेच्या पलिकडे तुम्ही काम केले आहे असं म्हणत कौतूक केले आहे.

मयुरचा रेल्वे मंत्रालयातर्फे ५० हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याने पुन्हा एकदा त्या अंध मातेच्या मदतीला धावून जात देशासह राज्यातील सर्वांचे मन जिंकले आहे. मयुरने रेल्वे मंत्रालयातर्फे जी बक्षीस म्हणून ५० हजारांची रक्कम मिळणार आहे. त्यातील अर्धी रक्कम त्या अंध मातेला देणार असल्याचं सांगितलं आहे.

अंध माता संगीता शिरसाठ यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी मयुरने रक्कम देण्याचं ठरवलं आहे. मयुर हा कर्जत तालूक्यातील तळवडे गावचा रहिवासी आहे. मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मयुरच्या नावाची राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याची माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
वाघ हो माझा, किती माया केलीस रे..जन्मदात्या आईसारखी का पोटच्या लेकरासारखी! बेटा जगायचं होतंस अजून
मास्कविना पकडल्यामुळे पोलिसाने कानाखाली मारली, तर तरुणानेही मारले पोलिसाला; घटनेचा व्हिडिओ व्हायरल
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पुढाकार घेणाऱ्या रतन टाटांचे न्यायालयाकडून कौतूक; केंद्राला मात्र झापले
राजेश टोपेंची मोदींना कळकळीची विनंती; आम्ही पाया पडायला तयार, पण ऑक्सिजन उपलब्ध करा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.