Share

वीरेंद्र सेहवागच्या पुतण्यावर पडला पैशांचा पाऊस; ‘या’ संघाने केली करोडो रुपयांची लयलूट

आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी झालेल्या खेळाडूंच्या मिनी लिलावात टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या पुतण्यावरही पैशांचा वर्षाव करण्यात आला. 26 वर्षीय अष्टपैलू मयंक डागरला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले. दिल्लीत जन्मलेल्या मयंक डागरचे शिक्षण शिमल्याच्या शाळेत झाले.

मयंकचे वडील जितेंद्र डागर हे देखील विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळले आहेत, जे सध्या दिल्ली महानगरपालिकेत (एमसीडी) कंत्राटदार आहेत. रिलेशनमध्ये सेहवाग हा मयंकचा मामा असल्याचे दिसते. मयंक हा उजव्या हाताचा फलंदाज असून डाव्या हाताने फिरकी करतो.

अलीकडेच दिल्लीत झालेल्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात मयंकने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ९२ धावांची शानदार खेळी केली. मयंक डागरसाठी बोली लावताना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात युद्ध झाले. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये होती, त्यावर हैदराबादने बोली लावली.

त्यानंतर राजस्थानने 25, 35 आणि 95 लाखांपर्यंत बोली लावली. हैदराबादने एक कोटी रुपयांची बोली लावली आणि ही प्रक्रिया सुरूच राहिली. राजस्थानने १.७ कोटींची बोली लावली. अखेर हैदराबादने त्याला १.८ कोटींची बोली लावून विकत घेतले. मयंक देशांतर्गत क्रिकेटमध्ये हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो.

मयंकच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्याने 29 सामन्यांत 87 बळी घेतले आणि एकूण 732 धावा केल्या. आपल्या एकूण टी-20 कारकिर्दीत मयंकने आतापर्यंत 44 सामन्यांत 44 विकेट घेतले आहेत आणि 72 धावा केल्या आहेत. त्याने लिस्ट ए मध्ये 46 सामन्यात 51 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय एका अर्धशतकाच्या मदतीने लिस्ट ए मध्ये एकूण 393 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या
ritesh deshmukh : ‘मी तुमची हात जोडून माफी मागतो पण कृपया…’; रितेश देशमुखवर का आली ही वेळ? जाणून घ्या…
subramanyam swami : मोदी हिंदुत्ववादी नाही, ज्यांना वाटतं ते चांगले काम करताय ते मोदीचे चमचे; भाजप नेत्याचा घरचा आहेर
जुळ्या नातवांचे मुकेश अंबानींकडून जोरदार स्वागत; १ हजार पुजाऱ्यांवर उधळले ३०० किलो सोने

खेळ ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now