बुमराहच्या लग्नाच्या शुभेच्छा देताना मयांक अग्रवालने केली मोठी चूक; वाचा का होतोय ट्रोल

मुंबई : जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी काल आयुष्याची नवी सुरूवात केली. या दोघांना क्रिकेटपटूपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनी शुभेच्छा दिल्या. बुमराहने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी दोघांना शुभेच्छा दिल्या, पण या दरम्यान क्रिकेटपटू मयंक अग्रवालकडून एक मोठी गफलत झाली. त्यामुळे मयंकला नेटकऱ्यांच्या जबरदस्त ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. या चुकीचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर जो स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. त्यानुसार मयांकने बुमराह आणि संजना यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्या देताना त्याने चुकून संजना गणेशनच्या ऐवजी संजय बांगर यांना टॅग केले.

चुकून संजय बांगर यांना टॅग केल्यामुळे, ‘अभिनंदन जसप्रीत बुमराह आणि संजय बांगर. तुमचं वैवाहिक आयुष्य आनंदी आणि आरोग्यदायी राहो’, असा त्याच्या ट्विटचा अर्थ निघाला. त्यामुळे मयंकला नेटकऱ्यांच्या जबरदस्त ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.

दरम्यान, चूक लक्षात आल्यावर मयंकने आपलं ट्विट लगेच डीलिट केलं आणि नवीन ट्विट करत संजना आणि बुमराहला शुभेच्छा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या 

खलनायक अमरीश पुरी यांच्या मुलीसमोर सारा आणि जान्हवी देखील पडतील फिक्या; पहा फोटो

NSA अजित डोवाल: इंदिरा गांधी असो किंवा नरेंद्र मोदी, सगळ्यांचे मन जिंकणारा माणूस

दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल, वर्षा गायकवाड यांनी केली ‘ही’ घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.