देश छोटा असला तरी ह्रदय मात्र मोठं! ‘या’ छोट्याश्या देशाने भारताला पाठवले २०० ऑक्सिजन कंसंट्रेटर्स

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला देशात साडेतील लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजन आणि औषधांचा तुडवडा निर्माण होत आहे.

देशभरात कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे धावून आले आहे. अशात भारताचा सर्वात चांगला मित्र मॉरिशियसनेही भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

मॉरिशियसने भारताला कोरोनाच्या संकटात २०० ऑक्सिजन कंसंट्रेटर्स भेट म्हणून दिले आहे. या जगभरात महाशक्तीशाली देश असतानाही मॉरिशियसने भारतासाठी ही लाख मोलाची मदत केली आहे. यामुळे भारताचे परराष्ट्रमंत्रालयाने मॉरिशियस सरकारचे आभार मानले आहे.

मॉरिशियसला भारताचा चांगला मित्र म्हणून ओळखले जाते. ही दोस्ती यामुळेही विशेष आहे, कारण मॉरिशियसवर चीनने खुप दबाव आणला आहे. अशा परिस्थितीतही मॉरिशियसने भारताला मदत केली आहे.

भारत आणि मॉरिशियसचे संबंध खुप चांगले आहे. मॉरिशियस राष्ट्रीय दिवस महात्मा गांधींच्या मीठाच्या सत्याग्रहादिवशी म्हणजेच १२ मार्चला साजरा करतात. मॉरिशियसच्या म्हणण्यानुसार याच प्रेरणेमुळे १९६८ मध्ये त्यांना इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाले.

भारताने २०१६ साली मॉरिशियसला ३५३ मिलियन अमेरिकन डॉलरचे विशेष पॅकेज दिले होते.या पॅकेजच्या माध्यमातूनच मॉरिशियसने सुप्रिम कोर्टच्या बिल्डिंग प्रोजेक्टला सुरुवात केली होती. या बिल्डिंगचे उद्धाटन २०२० मध्ये करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या-

‘लागीर झालं जी’ मधील साध्या भोळ्या जयडीचे हॉट फोटो व्हायरल; फोटो पाहून घायाळ व्हाल
विप्रोच्या अझीम प्रेमजींनी टाटा, अंबानींना टाकले मागे; कोरोनासाठी दररोज देणार २२ कोटींची मदत
कोरोनाच्या संकटात सिंघमने घेतला पुढाकार; रुग्णांच्या उपचारासाठी अजय देवगणने उभारले १ कोटी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.