मौलवींनी मशिदीत फडकवला तालिबानी झेंडा, पोलीस आले तर AK-47 काढली आणि.., पहा व्हिडीओ

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य येताच त्याचे परिणाम जगात दिसून येत आहेत. सध्या तेथील परिस्थिती काय आहे हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही. तालिबाणी आपल्या मनाचा कारभार करत आहेत. पोलिसांचाही त्यांच्यावर काहीच प्रभाव राहिलेला नाही.

पुर्ण व्यवस्था मोडकळीस आली आहे. सध्या तेथील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्यातीलच एका मौलवीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यात त्याने मशिदीवर तालिबानी झेंडा फडकवला आहे.

यानंतर पोलीस येताच त्याने आपल्या हातात एके-४७ रायफल काढलेली या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानातील एका मशिदीतील आहे. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की एक मौलवी येथे पोलिसांशी वाद घालत आहे.

खरे तर मौलाना यांनी मदरशावर तालिबानी झेंडा फडकवला. जेव्हा पोलिस झेंडा उतरवायला आले तेव्हा त्यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी सगळे खरं खोटं सांगायला सुरूवात केली. या दरम्यान, त्यांचा एक विद्यार्थी देखील एके -47 घेऊन तेथे उभा होता.

ही घटना राजधानी इस्लामाबादमधील सर्वात प्रसिद्ध मदरसा जामिया हाफसाची आहे. व्हिडीओमध्ये बोलणाऱ्या मौलवीचे नाव मौलाना अब्दुल अजीज आहे. ते पोलिसांना नोकरी सोडण्यास सांगतात. ते पुढे म्हणाले की अल्लाह तुम्हाला अधिक चांगल्या नोकऱ्या देईल. पोलिसांना धमकी देताना ‘हाथ तो लागाओ आप’ असेही ते म्हणाले.

मौलवी एके -47 सोबत बसलेले तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. जेव्हा पोलिस तालिबानी झेंडा उतरवायला आले, तेव्हा मौलाना ठाम होते. ते कोणत्याही अटीवर ध्वज उतरवण्यास सहमत नव्हते. सध्या, इस्लामाबादच्या डीसीने सांगितले की तालिबानी झेंडा फडकवल्याच्या आरोपावर दहशतवादविरोधी कायद्याखाली तक्रार नोंदवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.