Share

मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या मौलानाला कपडे काढून चोप चोप चोपला; पहा कुठे घडला हा प्रकार…

राज्यात सध्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या घटनांची आकडेवारी वाढत आहे. रोज वेगवेगळ्या ठिकाणी मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना आपल्या कानावर पडत असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे, मौलानाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला आहे.

ही धक्कादायक घटना वसई नायगाव येथे घडली आहे. एका मौलानाने सात वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित प्रकारची माहिती लोकांना समजताच लोकांनी त्या नराधम मौलानाला चांगलाच चोप दिला आहे. नागरिकांनी त्याला विवस्त्र करून चांगलीच धिंड काढली आहे.

आरोपी मौलानाचे नाव नूरल हसन असे आहे. ही घटना 27 मार्चला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. नायगाव पूर्वेच्या गणेश नगर परिसरात ही घटना घडली आहे. सात वर्षांची मुलगी दुकानात सुट्टे पैसे मागण्यासाठी गेली होती, यावेळी मौलानाने तिला आमिष देऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

मुलीवर जबरदस्ती करत असल्यामुळे मुलीने आरडा ओरडा करायला सुरुवात केली. मुलीचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक आवाजाच्या दिशेने धावले. यावेळी, मौलाना या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांना दिसले.

त्यानंतर संतप्त नागरिकांनी या मौलानाला विवस्त्र करून त्याला चांगलाच चोप दिला. त्याची धिंड काढण्यात आली. संबंधित घटना पोलिसांना माहिती झाल्यावर ते घटनास्थळी उपस्थित झाले. जमावाने त्यानंतर मौलानाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नुकताच रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात 24 मार्च ला अशीच एक घटना घडली होती. येथे अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत बागेत फिरायला गेली होती. त्यावेळी रंगाने काळा असणारा, गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातलेल्या जाडजूड व्यक्तीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडा ओरड करताच तेथून तो पळाला.

क्राईम

Join WhatsApp

Join Now