‘मुलगी झाली हो’ मधील माऊ आणि सिद्धार्थचा भन्नाट डान्स तुफान व्हायरल; एकदा पहाच

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्याच मालिकांचे शुटींग हलवण्यात आले आहे. मालिकांचे शुटींग जरी इतर राज्यात गेले असले तरी कलाकारांची धमाल मस्ती चालूच आहे. शुटींग मधून वेळ मिळताच ते वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोज आणि व्हिडिओ काढत असतात.

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील सिद्धार्थआणि माउ (साजिरी) चा डान्स व्हिडिओ व्हायरल झालेला पाहायला मिळतो. त्या दोघांनी ‘तुला बघून बघून गेलोया दंगून’ या मराठी गाण्यावर जोरदार डान्स केलेला पाहायला मिळतोय. त्यांच्या या व्हिडिओ वर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला पाहायला मिळतोय.

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील माउ म्हणजेच आताची साजिरीच्या गुणांचे आणि स्वभावाचे लोक प्रचंड चाहते आहे. या मालिकेतील साजिरीच आपल्या वडीलांवर असलेल प्रचंड प्रेम पाहायला मिळतंय. ती त्यांच्या सुखासाठी कोणताही त्याग करायला तयार आहे.

सजिरीच तिच्या कुटुंबाप्रती असलेले प्रेम प्रेक्षकांना भावल आहे. प्रेक्षक तिच्या कामावर खूप खुश  आहेत. साजिरी जन्मापासूनच बोलता येत नसत पण ती सगळ्यांच्या मनातल बरोबरओळखते.

अलीकडच्याच काही भागांपासून तिच्या वडलांच्या मनात तिच्याविषयी प्रेम निर्माण झाले आहे. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे. आता ते फक्त तिच्याच सुखाचा विचार करत असतात. त्यांनी तीच बारस घालून तीच नाव ‘साजिरी’ अस ठेवल.

साजिरीचे वडील तिच्या साठी उत्तम नवरा शोधत आहे. त्यांना तिच्यासाठी सिद्धार्थ सारखा मुलगा पाहिजे आहे. त्यातच सिद्धार्थच्या आईने तिच्या वडलांकडे साजिरीची मागणी केली आहे. आता पुढे आपल्याला पाहायला मिळणार की, साजिरी आणि सिद्धार्थच लग्न होणार की नाही.

‘मुलगी झाली हो’ मालीकेच पाहिलं शुटींग साताऱ्यात सुरु होत, परंतु लॉकडाऊनमुळे ते आता कलाकार आणि तंत्रज्ञ शुटींग गुजरात मध्ये करत आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘मुलगी झाली हो’ चे नवीन एपिसोड आपल्याला पाहायला मिळतात.

हे ही वाचा-

प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूरने गुपचूप केले लग्न? भांगात कुंकू भरलेले फोटो आले समोर

विनायक माळीचे व्हिडिओ व्हायरल होण्यामागच खर कारण आलं समोर; जाणून घ्या पुर्ण माहिती..

लाडकी लेक जीजासोबत अभिनेत्री उर्मिला कोठारेचे भन्नाट नृत्य, लेकीनेही धरलाय ठेका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.