कुली चित्रपटातील हा चिमुकला आठवतो का? आता हा बिझनेस करून कमावतोय करोडो रूपये

‘छोटू तुझे भुख लगी है…’ अमर अकबर अँथनी चित्रपटातील या लहान मुलाच्या डायलॉगने असा एकही माणूस नसेल जो भाऊक झाला नसेल. त्या चित्रपटातच त्या लहान मुलाला पाहून सगळ्यांना वाटले होते की हा मुलगा खुप मोठा होणार.

पण तो अभिनेता होईल असे अनेकांना वाटत होते. पुढे तोच लहान मुलगा बिझनेस करून करोडोंचा मालक होईल असे कोणालाही वाटले नव्हते. या चिमुरड्याने अँथनी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या बालपणातील अभिनय केला होता.

याच लहान मुलाने कुलीमध्येही अमिताभ यांच्या लहानपणीची भुमिका साकारली होती. पण हा लहान मुलगा कोण आहे? आणि तो आज काय करत आहे? तो काय करतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मास्टर रवी असे या मुलाचे नाव आहे ज्याने १९७६ च्या ‘फकीरा’ चित्रपटातून पदार्पण केले होते. परंतु १९७७ च्या ‘अमर अकबर ऍन्थनी’ या चित्रपटापासून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली होती. त्यामध्ये त्यांनी उत्तम अभिनय केला होता.

या चित्रपटाने मास्टर रवीला एका रात्रीत सुपरस्टार बनवले होते. अनेकांनी त्यांच्या अभिनयाची प्रशंसा केली होती. या चित्रपटानंतर मास्टर रवीने ‘देश प्रेमी’, ‘शक्ती’ आणि ‘कुली’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

या चित्रपटांमध्ये मास्टर रवी यांनी अमिताभ यांचे बालपण साकारले होते. मास्टर रवी यांनी आपल्या कारकीर्दीत विविध भाषांमध्ये ३०० हून अधिक चित्रपट केले आहेत. अमिताभ बच्चन, बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्सनीसुद्धा इतके सिनेमे केले नाहीत.

मोठे झाल्यावर मास्टर रवी यांनी रवी वलेचा नाव ठेवले आणि ते याच नावाने चित्रपटात फेमस झाले. त्यांनी बर्‍याच टीव्ही कार्यक्रमांमध्ये देखील काम केले जे खूप लोकप्रिय होते. परंतु जेव्हा आपल्याला तुम्हाला कळेल की मास्टर राजू किंवा रवी वलेचा आज काय करतात तर तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल.

तुम्ही हे वाचून आश्चर्यचकित व्हाल की मास्टर रवी म्हणजेच रवि वलेचा यांचे आज हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत खूप मोठे नाव आहे. ते भारतातील टॉपच्या प्रायवेट सेक्टर बॅंकांना आपली हॉस्पिटॅलिटीची सेवा पुरवत आहेत.

दोन दशकांपासून ते या क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांनी यामध्ये खुप नाव कमावले आहे. अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून हॉस्पिटॅलिटी आणि फॅकल्टीमध्ये एमबीए डिग्री घेतल्यानंतर रवि वालेचा यांनी या क्षेत्रात प्रवेश केला.

आज त्यांचा व्यवसाय कोटींच्या घरात आहे. एवढेच नव्हे तर जे तरूण या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करण्यास तयार आहेत त्यांना रवी वलेचा व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण व इतर कौशल्येही शिकवत असतात. खरंच रवि वलेचा यांनी संपादन केलेले यश हे खुप आश्चर्यकारक आहे.

त्यांनी चित्रपटांमध्ये काम करताना अमिताभ बच्चन यांचा विक्रम तर मोडलाच पण हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही ते बादशाह आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
अभिनेत्री नोरा फतेहीने पॅलेस्टाईनवरच्या अन्यायाविरोधात उठवला आवाज; चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन
रश्मिका मंदानाने मारली पलटी, आधी म्हणाली विराट माझा फेवरेट, पण आता घेतलं दुसऱ्याचं नाव
जगातली सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर, एकाच चार्जमध्ये धावते २४० किमी; किंमत फक्त..
‘सोनू के टिटू की स्वीटी’ फेम अभिनेत्री आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण; पहा तिच्या मुंबईतील आलिशान घराचे फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.