आजोबांचा नादच नाय! सॅनिटायझर हाताला दिले लावायला, आजोबांनी हातापायांची केली मालिश; पहा व्हिडिओ

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोना महामारीमध्ये अनेक भावूक व्हिडिओ, फोटो व्हायरल झाले आहेत. तसेच काही व्हिडिओ प्रेरणा देणारेही पाहायला मिळत आहेत. रोज काहीतरी नवीन सोशल मिडियावर व्हायरलं होत असतं.

कोरोनाची महामारी आल्यापासून सोशल मिडियावर मास्क, सॅनिटायझर यावर अनेक मजेशीर व्हिडिओ, फोटो व्हायरल झाले आहेत. मास्क सॅनिटायझरवर मिम्सही व्हायरल झाले आहेत. यामुळे लोकांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे.

प्रशासनाकडून कोरोनामध्ये स्वत:चा बचाव करण्यासाठी  हात स्वच्छ धुवा. सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करा. असं वारंवार सांगण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वी एका व्यक्तीने एटीएममधील सॅनिटायझरची बाटली चोरून नेली होती. आता असाच एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर हाताला लावायला सॅनिटायझर दिले जाते. तसेच अंगावरही फवारले जाते. आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एका बाबांनी चक्क सॅनिटायझरने अंगाची मालिश केली आहे. सोशल मिडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता. एक वयस्कर बाबा खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांंनी मास्कही लावलेला आहे. आजुबाजूलाही लोकं बसलेले आहेत. एक मुलगा सॅनिटायझरची बाटली घेऊन बाबांना सॅनिटायजर लावायला देतो. बाबांंच्या हातावर सॅनिटाझर दिल्यावर बाबांनी हाताला, डोक्याला, तोंडाला, पायाला सॅनिटायझर लावत मालिश केली आहे.

बाबा असं करत असताना तिथं उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने व्हिडिओ शुट करत सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी पोस्ट केला आहे. कोरोना यांचं काहीच वाकडं करू शकत नाही. असं कॅप्शन दिलं आहे.

कोरोनामध्ये सॅनिटायझर सर्वजण वापरत आहेत. सॅनिटायझरच्या वापराने आरोग्यावर परिणार होत असल्याचं बोललं जात आहे. मात्र कोरोमध्ये सॅनिटायझर कशा प्रकारे वापरायचं आणि स्वत:चा बचाव करायचा हे बाबांनी दाखवून दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
विषारी साप खाल्याने कोरोना होत नाही म्हणत त्याने खाल्ला विषारी जिवंत साप, पुढे जे घडलं..
सचिनची मुलगा सारा तेंडूलकरसोबतच्या नात्यावर क्रिकेटपटू शुभमन गिलने सोडले मौन; स्पष्ट शब्दांच केला नात्याचा…
DDLJ मधील छुटकी इतकी बदलली, फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम, आता करते ‘हे’ काम
भारताला घाबरला पाकीस्तान! आता भारताच्या ‘या’ गोष्टीमुळे पाकीस्तानला भरली धडकी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.