१२ वर्षांपुढील मुलांसाठीही मास्क बंधनकारक! WHO ने प्रसिद्ध केल्या नव्या गाईडलाईन

जिनिव्हा | जगभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे वेळोवेळी केंद्र सरकारकडून नव्या सूचना देण्यात येतात. मात्र तरीही या कोरोना व्हायरसला रोखण्यात सरकराला यश मिळाले नाही.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी पहिल्या दिवसापासून प्रत्येक नागरिकाला मास्कची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, अशा परिस्थितीत मोठ्यांसाठी मास्क बंधनकारक आहे मग मुलांचे काय? हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला आहे.

त्यामुळे, याबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेने मुलांच्या मास्कबाबत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. आरोग्य संघटनेच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही प्रौढांसारखे मास्क घालावे लागणार आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, मास्क घालण्यासाठी जगभरात जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही लागू होणार आहे.

कारण, १२ वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना मोठ्यांप्रमाणे कोरोनाचा धोका जास्त असतो. जेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही अशा ठिकाणी मुलांनीही मास्क घालावे. मात्र, ५ वर्षाखालील मुलांना मास्क घालणे बंधनकारक असणार नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.