Share

‘मेजर’ पाहून शहीद संदीप उन्नीकृष्णनचे आई-वडील भावुक, अभिनेत्याला मिठी मारत सांगितली आठवण

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत असलेला ‘मेजर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तेलुगू सुपरस्टार अदिवी शेष(Adivi shesh) याने या चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अभिनेता अदिवी शेष याने खूप मेहनत घेतली आहे. (Martyr Sandeep Unnikrishnan’s parents are emotional after seeing ‘Major’)

नुकतंच मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आई-वडिलांनी हा चित्रपट पहिला आहे. यावेळी ‘मेजर’ चित्रपट पाहिल्यानंतर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मेजर उन्नीकृष्णन शहीद झाले होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आई-वडिलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.

चित्रपट पाहिल्यानंतर शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या वडिलांनी सांगितले की, ” मेजर हा अतिशय उत्तम चित्रपट आहे. मी संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करतो. आम्ही जे पहिले आहे, जे भोगले आहे. ते उत्तम पद्धतीने चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. यामुळे आम्हाला आमच्या सर्व वाईट आठवणी विसरायला लावल्या आहेत”, असे संदीप उन्नीकृष्णन यांच्या वडिलांनी सांगितले आहे.

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारणारा अभिनेता अदिवी शेष याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेता अदिवी शेष याने शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आई-वडिलांसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये अभिनेता अदिवी शेष मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या वडिलांसमोर बसलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सिनेमा पाहिल्यानंतर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आईने भावुक होत भूमिक साकारणाऱ्या अभिनेता अदिवी शेषला मिठी मारली आहे.

यातील एका फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेता अदिवी शेष याने लिहिले आहे की, “बंगळूरमध्ये ‘मेजर’ चित्रपटासंदर्भात काकांच्या भावना मी पहिल्यांदा ऐकल्या. त्यांच्या भावना आमच्या प्रेरणेचे कारण आहेत.” दुसऱ्या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेता अदिवी शेष याने लिहिले आहे की, “अंकल आणि अम्मा, हे सगळं आम्ही तुम्हा दोघांसाठी केलं आहे.”

शशी किरण टिक्का यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने हिंदी भाषेत सुमारे ३ ते ४ कोटींची कमाई केली आहे. दक्षिण भारतात ‘मेजर’ या चित्रपटाने सुमारे १५ कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘मेजर’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मी पार्वतीचा अवतार आहे म्हणत महादेवासोबत लग्न करायला महिला पोहचली हिमालयात
रंजना मला भारीच पडायची’; अशोक सराफांनी सांगीतला अभिनेत्री रंजना देशमुख सोबतचा ‘तो’ किस्सा
महीलेचा पार्वतीचा अवतार असल्याचा दावा, महादेवासोबत लग्न करण्यासाठी उचलले मोठे पाऊल…

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now