‘तु फक्त मुंबईत येऊन भेट, तुझं लग्न मी लावतो’; सलमान खानचा त्या दोन फुटी बुटक्याला शब्द

मुंबई | सोशल मीडियावर एक अनोखा व्यक्ती एका अनोख्या कारणामुळे चांगलाच व्हायरल झाला. दोन फुटांच्या मोहम्मद अझिम नावाच्या तरुणाने आपलं लग्न होत नाही म्हणून थेट पोलिस ठाणं गाठलं. विशेष बाब म्हणजे त्याची ही बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. मात्र आता याची दखल चक्क बॉलिवूड भाईजान सलमान खानने घेतली असल्याचा दावा मोहम्मदने केला आहे.

त्याच झालं असं की, २ फुट उंची असणाऱ्या उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील मोहम्मदला लग्नासाठी नवरी मिळत नाही. मग चक्क त्याने पोलिस ठाणे गाठत आपलं लग्न लावून देण्यासाठी पोलिसांना गळ घातली. पण त्याची अनोखी समस्या ऐकून पोलिसही चक्रावून गेले.

मोहम्मदचे वय २६ वर्षे आहे. त्याची उंची नसल्यामुळे त्याला नवरी मिळत नाही. त्याला त्याच्या लग्नाची चिंता चांगलीच सतावतेय. म्हणून तो पोलिसांकडे गेला. मात्र पोलीस स्टेशनमधूनही त्याला काहीच उत्तर मिळाले नाही. तो मोकळ्या हातानेच परतला. परंतु यावेळी सोशल मीडियावर त्याची बातमी व्हायरल झाली.

यानंतर त्याला दहा-बारा पोरींचे फोन येऊन गेले. तसेच अनेक सेलिब्रिटींचेही त्याला फोन येत आहेत. यामध्ये सलमान खानने स्वत: फोन करुन मुंबईला बोलावले असल्याचा दावा आता मोहम्मदकडून केला जात आहे. पण याबाबत सलमान खानने कुठलाही अधिकृत स्पष्टीकरण दिले नाही.

महत्वाच्या बातम्या-
करिश्मा कपूर नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे अक्षय खन्नाचे पहीले प्रेम; नाव वाचून धक्का बसेल
दिलेले वचन माधुरीने पुर्ण केले, खेड्यातील गरीब मुलाला घेतले डान्स दिवानेमध्ये, पहा व्हिडीओ
शाहरुख खानची पत्नी बनायला ऐश्वर्याने दिला होता नकार; म्हणाली, हा तर…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.