विरोध पत्करून केले लग्न, मात्र अर्ध्यावरच जवानाच्या पत्नीने सोडली साथ, वाचा हृदय हेलावणारी घटना

नागपूर । नागपूरमध्ये एक दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. येथे एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या दाम्पत्याचे विश्व एका क्षणात उद्धवस्त झाले आहे. अनेक संकटांना तोंड देत त्यांनी संसार उभा केला होता. घरच्यांचा विरोध असताना लग्न केले होते. मात्र या महिलेचे डेंग्युमुळे निधन झाले आहे.

यामुळे त्यांचा संसार अर्ध्यावरच मोडला आहे. डेग्यूबाबत लवकर निदान झाले नाही. टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिली नाही. यामुळे ही घटना घडली आहे, असे कुटुंबीयांकडून सांगितले जात आहे. यामुळे सर्वांवर दुःख कोसळले आहे.

याबाबत तारका पिल्लेवार असे मृत महिलेचे नाव आहे. पती प्रलय पिल्लेवार हे इंडियन एअर फोर्समध्ये नोकरी करत आहेत. त्यांनी आपले प्रेम मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. त्यांच्या लग्नाला विरोध झाला मात्र त्यांनी लग्न केले. १५ वर्षांपासून ते एकत्र होते.

झोपडपट्टीत राहून त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे. त्यांना अचानक थंडी आणि ताप आला होता. त्यांनी जवळच्या रुग्णालयात उपचार घेतले. डॉक्टरांनी गोळ्या औषध देऊन घरी जाण्यास सांगितले. मात्र त्यांची प्रकृती बिघडली, त्यांच्या रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर प्लेटलेट कमी आणि डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यांचे पती देखील लगेच घरी आले, मात्र त्यांच्या मांडीवरच अखेरचा श्वास घेतला. यामुळे त्यांना धक्काच बसला. एका क्षणातच सगळं काही संपलं. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपूरमध्ये सध्या डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.

दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या दाम्पत्याचे १५ वर्षांचे प्रेम एका क्षणात काळाआड गेले आहे. यामुळे सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये कोरोना सोबतच डेंग्यूचे रुग्ण देखील आढळून येते आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.